agriculture news in Marathi, organic agri produce selling center open in Mumbai, Maharashtra | Agrowon

मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

सेंद्रिय शेतमाल उत्पादन ही काळाची गरज असून वसुंधरा शेतकरी उत्पादक गटाने उत्पादनासह विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे हे कामाचे यश आहे. त्यामुळे काळाच्या गरजेप्रमाणे येथील ग्राहकांना विषमुक्त व रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध होणार आहे. 
-  कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नाशिक
 

नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही अनेक शेतकरी सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वसुंधरा सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाची स्थापना केली. उत्पादित केलेल्या शेतमालाची मुंबईत थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याचा निर्णय घेऊन अंधेरी येथे डी. एन. नगरमध्ये कायमस्वरूपी थेट शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र सुरू केले आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) नाशिक यांच्या वतीने २०१७-१७ पासून ३८ गटांवर जिल्ह्यात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत काम सुरू आहे. या योजनेंतर्गत सहभागी ३८ शेतकरी गटांचे हमी पद्धतीने प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील १९०० एकर क्षेत्रावर १३४९ शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेतात. सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध असून शेतकरी आता स्वतःची बाजारपेठ व विक्रीव्यवस्था उभी करू लागले आहेत. 

मुंबईत नुकतेच या केंद्राचे उद्‍घाटन नाशिक आत्माचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिन्नर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, पराज ऑरगॅनिक चे डॉ. विनोद जैन, डॉ. दीपिका जैन, वसुंधरा शेतकरी गटाचे भागवत बलक, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, नाशिक जिल्ह्यातील  सेंद्रिय शेतीतील प्रगतिशील शेतकरी यशवंत गावंडे, माणिकराव कासार, यांसह विविध शेतकरी व गटातील सहभागी शेतकरी उपस्थित होते. मुंबईतील या भागातील अनेक ग्राहकांनी या केंद्राला भेटी देत मालाला पसंदी दिली.

ऑनलाइन व घरपोच विक्री पद्धत
सेंद्रिय भाजीपाला, विदेश भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, खाद्यतेल, गावरान तूप व मसाले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हा शेतमाल ऑनलाइन व घरपोच विक्री पद्धतीने शेतमाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इतर बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...
रस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव...नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेबाबत...नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू...सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...