Agriculture news in Marathi, Organic Agricultural Research Center to set up Ladakh | Agrowon

लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन केंद्र

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर आघाडीवर असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता कृषी संशोधन क्षेत्रात उतरणार आहे. लवकरच लडाख येथे कृषी क्षेत्रावरील विविध संशोधनाबरोबर जैविक शेती संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. तेथील अभ्यासक्रमाची माहिती घेऊन हे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची समिती लवकरच लडाख दौऱ्यावर जाणार आहे. 

पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर आघाडीवर असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता कृषी संशोधन क्षेत्रात उतरणार आहे. लवकरच लडाख येथे कृषी क्षेत्रावरील विविध संशोधनाबरोबर जैविक शेती संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. तेथील अभ्यासक्रमाची माहिती घेऊन हे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची समिती लवकरच लडाख दौऱ्यावर जाणार आहे. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर या भागात शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे, उद्योग सुरू करण्यासाठी व या भागात गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. यामुळे या भागात कृषी क्षेत्रासह, आर्थिक विकास, रोजगार व शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहे. 

देशातील अनेक शिक्षण संस्थांनीही जम्मू कश्‍मीरमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे केंद्राने लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्याने त्या भागातही विकासाची पाऊले उचलली जात आहेत. पुणे विद्यापीठाने तेथे शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठीचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला होता. 

लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनीही संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी लडाखला भेट द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. त्यानुसार पुणे विद्यापीठाने संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी कुलगुरू करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. त्यामध्ये विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांचा समावेश आहे. १५ नोव्हेंबरपूर्वी ही समिती लडाखचा दौरा करणार असून, तेथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठीची प्रक्रिया मार्गी लावली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आहे.  

कृषीसह भूशास्त्र विषयावर होणार संशोधन 
लडाखमधील संस्थांच्या मदतीने पुणे विद्यापीठ हिमनदी, भूशास्त्र, कृषी, सेंद्रिय आणि औषधी वनस्पती शेती, नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयावर संशोधन करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ याची माहिती विद्यापीठाने मागविली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...