नाशिकमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरु

नाशिकमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरु
नाशिकमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरु

नाशिक  : शहरातील ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा तसेच उत्पादकांना विक्रीची सोय व्हावी, यासाठी शहरातील सिटी सेंटर मॉल येथे ‘सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ केंद्राची सुरुवात रविवारी (ता. ९) सुरू करण्यात आली आहे. रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन, आत्मा, कृषी विभाग नाशिक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू झाला आहे. यासाठी सिटी सेंटर मॉलच्या वतीने मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरू झालेल्या या उपक्रमास ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ हा उपक्रम दर रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू असणार आहे. यात विशेषतः फक्त सेंद्रिय प्रमाणीकरण ज्यामध्ये P.G.S India व NPOP नोंदणीकृत व प्रमाणीकरण असलेल्या शेतकऱ्यांना सहभागी करण्यात आलेले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोमीफ इंडियाचे राज्य समन्वयक शरद सायंकर यांनी समन्वय घडवून आणला आहे. या उपक्रमाप्रसंगी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, ‘रोमीफ इंडिया''चे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी, उपाध्यक्ष ओम देशमुख नाशिक ‘आत्मा’ प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल उत्पादित करून सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सदुभाऊ शेळके, विशाल जाधव, श्रीराम क्षीरसागर, अनिल रायते, अक्षय नवले आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते. सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांना मार्केट उपलब्ध करून देणे हा या मार्केटचा उद्देश असून, दर रविवारी हा सेंद्रिय बाजार भरविला जाणार आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शरद सायंकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com