agriculture news in marathi Organic Agriculture product Showroom started by Vithoba Farmers Group | Page 2 ||| Agrowon

विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय शेतीमालाचे शोरूम उभे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

विठोबा सेंद्रिय भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकरी गटाने ग्राहकांना एकाच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यासह धान्य उपलब्ध व्हावे ‘ग्रीन हायलंड’ या शोरूमची उभारणी केली आहे.

नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्यासह शेतीमालाची थेट विक्री करणाऱ्या विठोबा सेंद्रिय भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकरी गटाने ग्राहकांना एकाच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यासह धान्य उपलब्ध व्हावे ‘ग्रीन हायलंड’ या शोरूमची उभारणी केली आहे. सात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या सर्व प्रकारच्या डाळींसह शेतीमाल, भाजीपाला, फळे उपलब्ध होणार आहेत.

शुभारंभ प्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, उत्तर नांदेडचे आमदार बालाती कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, औरंगाबाद विभागाचे लेखा व कोशागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे, महिला व बालविकास सभापती संगीता डक पाटील, राजश्री पाटील, सीए नागेश जाधव, एकनाथ पावडे, सविता पावडे, विशाल पावडे, विठ्ठल पावडे यांच्यासह शेतकरी, कृषी उद्योजक, विठोबा परिवाराचे शेतकरी उपस्थित होते. खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांनी स्वतः विक्री करून प्रक्रिया उद्योगात आले पाहिजे, आपला नैसर्गिक व सेंद्रिय माल जगाच्या बाजारात पाठवून पुढची हरित क्रांती केली पाहिजे व यासाठी शासन आणि स्वतः सोबत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात अशा शेतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. रविशंकर चलवदे उत्तम सोनकांबळे मार्गदर्शन केले.

भाजीपाल्यासह फळे, धान्य उपलब्ध
विठोबा नैसर्गिक भाजीपाला गट शेतकऱ्यांना सर्वच प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या आदी उपलब्ध करून दिला जातो. सध्या शोरूमच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या पिकविलेले फळे, शेतीमाल, जात्यावरील दाळी, रोस्टेड धान्य, रेस्यिड्यू फ्री ज्यूस, काळा तांदूळ, खपली गहू, सल्फर फ्री शुगर, सेंद्रिय गूळ, गूळ पावडर आदी मिळणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...