`सात्विक’कडून घरपोच सेंद्रिय शेतमाल 

‘ सातारा ः ‘कोरोना’ संसर्ग होऊ नये यासाठी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॅाकडाऊन जाहीर केला आहे. या लॅाकडाऊनमध्ये शहरी ग्राहकांची भाजीपाला, शेतमालाची आबाळ होऊ नये यासाठी मालगाव (ता. सातारा) येथील सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुपने सेंद्रिय शेतमाल घरपोच केला जात आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार शेतमाल मिळू लागला आहे.
Organic Farming at Home by Satwik
Organic Farming at Home by Satwik

‘ सातारा ः ‘कोरोना’ संसर्ग होऊ नये यासाठी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॅाकडाऊन जाहीर केला आहे. या लॅाकडाऊनमध्ये शहरी ग्राहकांची भाजीपाला, शेतमालाची आबाळ होऊ नये यासाठी मालगाव (ता. सातारा) येथील सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुपने सेंद्रिय शेतमाल घरपोच केला जात आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार शेतमाल मिळू लागला आहे. 

मालगाव (ता. सातारा) येथील सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुपने सेंद्रिय शेतमाल घरपोच करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या शेतकरी गटातील शेतकरी अनेक वर्षांपासून सेंद्रिय भाजीपाला केला जात असून त्यांच्या आॅर्ग्रनिक सर्टीफिर्केटही आहे. या अगोदर मुंबई येथील अनेक सोसायट्यांना भाजीपाला घरपोच पुरविला जात आहे. 

सध्या ‘कोरोना’च्या संसर्गामुळे सातारा शहरातील ग्राहकांना भाजीपाल्याचा तुटवडा भासत असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून त्यांनी विषमुक्त भाजीपाला, शेतमाल घरपोच देण्याची सुविधा केली जात आहे. आॅडर्रच्या दुसऱ्या दिवशी शेतमाल घरपोच केला जात आहे. ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर रहावे, यासाठी ग्राहकांना व्हाॅट्सअॅप मोबाईल नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर ग्राहकांनी आवश्यक असणारा शेतमाल, भाजीपाल्याची मागणी नोंदवली जाते. 

मागणी झालेली आडर्रची गटाकडून शेतमालाचे पॅकिग केले जाते. दुसऱ्या दिवशी ही आॅडर्र घरपोच केली जाते. ग्राहकांना दराबाबत तक्रार होऊ नये यासाठी शेतमालाच्या दराची यादी दिली जाते. यामुळे होणाऱ्या भाजीपाल्याचे बिल ग्राहकांच्या अगोदर माहिती होते. 

बिलासाठी आॅनलाईन सुविधा  खरेदी केलेल्या भाजीपाल्याची ग्राहकांना रोखसह आॅनलाईन बिल स्विकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे ग्राहकांना लॅाकडाऊनमध्ये पैसे काढण्याची गरज लागत नाही. त्याचबरोबर आरबीआयने रोखीचे व्यवहार कमी करण्याचा दिलेला सल्ला ही पाळला जात असून सुट्ट्या पैश्याचा कटकट कमी होत आहे. 

ग्राहकांकडून मागणी झालेल्या भाजीपाला तसेच अन्नधान्याचे अर्धा व एक किलोचे पॅकिंग केले जाते आहे. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोशल डिसटन्स सांभाळून हा वितरण केले जात आहे. सध्या दिवसाकाठी अडीच टनापर्यंत विविध शेतमाल पोचविला जात आहे.  - विक्रम कदम, अध्यक्ष, सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुप, मालगाव.  संपर्क- ९७६६५५०५९१. 

या दराने केली जात आहे विक्री (दर प्रतकिलो कंसात दर रुपयात)  कांदा (३०), लसून (१४०), बटाटा (३८), टोमॅटो (२८), वांगी (५५), कोबी (३७), काकडी (४२), दोडका (६२), कारले (६०), हिरवी मिरची (७२), चिक्कू (७५), स्टॅाबेरी (१५०), मेथी १५ (प्रतिपेंडी), कोथिंबीर १५ (प्रतिपेंडी), पालक १५ (प्रतिपेंडी).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com