शेतातील काडीकचऱ्याचे सेंद्रिय खत करावे

शेतातील काडीकचऱ्याचे सेंद्रिय खत करावे
शेतातील काडीकचऱ्याचे सेंद्रिय खत करावे

जातेगाव जि. बीड : दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतातील जो काही काडीकचरा आहे, त्याचे सेंद्रिय खत कसे करता येईल, हे पाहावे. केवलिंग द्रावणाचा वापर आणि चर सरीच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करण्यास मदत कशी मिळेल, याची दक्षता घेऊन सेंद्रिय, गांडूळखताचा वापर करावा. त्याद्वारेेे शेती जलयुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक सतीश केसभट यांनी केले. 

जातेगाव (ता. गेवराई) येथे `सकाळ ॲग्रोवन`, `महाधन'' यांच्यातर्फे `दुष्काळावरील उपाययोजना व खत व्यवस्थापन'' या विषयावर शेतकरी संवाद कार्यक्रम कार्र्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता. २०) करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सतीश चव्हाण होते. मंडळ कृषी अधिकारी संतोष घसिंग, `महाधन''चे गणेश खाडे, दीपक वाघचौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पांढरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास चव्हाण, माजी सरपंच अशोक चव्हाण, भास्कर चव्हाण, कालिदास काकडे उपस्थित होते.

शेती कसताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीपासून मुक्ती मिळू शकते, असे घसिंग यांनी सांगितले. खाडे यांनी रासायनिक खते कसे द्यावी, याची माहिती दिली. गोविंद मस्के यांनी प्रास्ताविक केले. भास्कर सोळंके, श्‍याम सोळंके, दत्ता वाघमारे, मधुकर चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com