सेंद्रिय सोयाबीन, तूर, कपाशीचे ‘वनामकृवि’त बीजोत्पादन प्रात्याक्षिक

सेंद्रिय सोयाबीन, तूर, कपाशीचे ‘वनामकृवि’त बीजोत्पादन प्रात्याक्षिक
सेंद्रिय सोयाबीन, तूर, कपाशीचे ‘वनामकृवि’त बीजोत्पादन प्रात्याक्षिक

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पांतर्गत सेंद्रिय सोयाबीन, तूर, कपाशीचे बीजोत्पादन प्रात्यक्षिक घेण्यात आले. सध्या सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्री सुरू झाली आहे. या प्रकल्पांतर्गत मराठावाडा विभागातील सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॅा.आनंद गोरे यांनी दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये १ जुलै २०१५ पासून सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र प्रकल्पासाठी पाच वर्षांसाठी निधी मंजूर करण्यात आल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये यंदाच्या एप्रिल महिन्यापासून तत्कालीन कुलगुरू डॅा. बी. व्यंकटेश्वरलू, विद्यमान कुलगुरू डॅा. अशोक ढवण, संशोधन संचालक डॅा. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती प्रक्षेत्रजवळ (सायाळा गावाजवळ) काही वर्षांपासून पडीक तसेच रासायनिक खतांचा वापर नसलेल्या ३० हेक्टर क्षेत्राची सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली. याठिकाणी कृषी विद्या, उद्यानविद्या, कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागांतर्गत विविध विषयांतर्गत संशोधन प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. प्रक्षेत्रावर चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे.  कृषीविद्या अंतर्गत सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कृषी विद्यापीठ पद्धत, झिरो बजेट शेती, शेतकरी पद्धती, ब्रह्मकुमारीज सेंद्रिय शेती पध्दती, एकात्मिक शेती पध्दती (कृषी विद्यापीठ शिफारशीत) या पाच शेती पध्दतींचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. प्रक्षेत्रावर गांडूळखत निर्मिती, व्हर्मीव्हाॅश, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क निर्मिती केली जाते.  सेंद्रिय उत्पादनास ग्राहकांची चांगली मागणी असल्यामुळे येत्या काळात भाजीपाला लागवडीवर भर दिला जाणार आहे. सेंद्रिय बीजोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

देशी गायींचे संगोपन  सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पांतर्गत पाच लाल कंधारी गायीचे संगोपन करण्यात येत आहे. सध्या या गाई दुधात आहेत. उत्पादित दुधाची विक्री विद्यापीठांतर्गत करण्यात येते.

भात लागवडीचे नियोजन ः  पुढील वर्षी सेंद्रिय पद्धतीने भात लागवडीचे नियोजन आहे. लागवडीसाठी आंध्र प्रदेश, आसाम, ओदिशा येथून भात बियाणे मागविण्यात येणार आहे. असा आहे प्रकल्प 

  • सेंद्रिय बीजोत्पादन संशोधन प्रात्यक्षिक ः सोयाबीनच्या एमएयूएस १६२ जातीचे २.५ हेक्टर, तुरीच्या बीडीएन ७११ जातीचे २ हेक्टर आणि कपाशीच्या विविध जातींचे ५ हेक्टरवर बीजोत्पादन.
  • प्रकल्पातून सोयाबीनचे ११ क्विंटल बियाणे उत्पादन.
  • आजवर झालेल्या वेचण्यामध्ये ४ क्विंटल कापूस उत्पादन.
  • सेंद्रिय भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिक 
  • ३० गुंठे क्षेत्रावर भेंडी,२० गुंठे क्षेत्रावर टोमॅटो आणि २० गुंठे क्षेत्रावर दोडका लागवड.
  • टोमॅटोचे १८ क्विंटल उत्पादन. सरासरी १५ ते २० रुपये प्रति किलो दराने विक्री. 
  • दोडक्याचे ६ क्विंटल उत्पादन. सरासरी ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री.
  • भेंडीचे २ क्विंटल उत्पादन. सरासरी ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री.
  • भाजीपाल्याची विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांना थेट विक्री. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com