`विलास`चा सेंिद्रय साखर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सेंिद्रय साखरेला मोठी मागणी आहे. आतापर्यंत सेंिद्रय गूळ आपण पाहिला आहे. पण, ऊस लागवडीपासून ते सहकारी कारखान्यात सेंिद्रय साखर उत्पादन करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. सेंद्रिय उसाला टनाला शंभर रुपये अधिकचा भाव दिला जाणार आहे. तसेच ठिबकही सक्तीचे केले जाणार आहे. - अमित देशमुख, संस्थापक अध्यक्ष,विलास सहकारी साखर कारखाना.
सेंद्रीय साखर उत्पादन
सेंद्रीय साखर उत्पादन

लातूर ः ग्राहक आता मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतमालाकडे वळत आहेत. देशात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाची बाजारपेठ तयार होऊ पाहत आहे. ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने सेंद्रिय ऊस लागवड, उत्पादनापासून ते सेंद्रिय पद्धतीची साखर तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. सहकारी साखर कारखाना उद्योजकतात राज्यातच नव्हे, तर देशात हा पहिला प्रयोग आहे. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या विलास सहकारी साखर कारखान्याने सातत्याने नवनवीन प्रयोग करून विक्रमही केले आहेत. शेतकऱ्यांची मानसिकता सेंिद्रय शेतीकडे वळवणे तसे जि.िकरीचे काम होते. याकरिता कारखान्याने पाच सेंिद्रय ऊसतज्ज्ञ व २२ कृषी सहायकाची टीम तयार केली. गेल्या वर्षी गावागावांत बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सेंिद्रय उसाचे महत्त्व, शेतकऱ्यांना होणाऱ्या फायदे, शेतीच्या आरोग्याचे फायदे पटवून सांगत मानसिकता बदलण्याचे काम केले. कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रयोगशील अशा सहाशे शेतकऱ्यांची निवड केली. कमीत कमी एक एकरपासून ते जास्ती जास्त पंधरा एकरपर्यंत त्यांचे क्षेत्र घेतले. अशा पद्धतीने दीड हजार एकर क्षेत्रावर २०१७-१८ मध्ये सें.िद्रय ऊस प्रकल्प राबविण्यात आला. निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे अपेडाकडे सें.िद्रय प्रमाणीकरण करून घेण्यात आले. त्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या प्रयोगाला सुरवात करण्यात आली. स्वतः कारखान्याने शेतकऱ्यांना उधारीवर सें.िद्रय खताचा पुरवठा केला. इतकेच नव्हे, तर त्याच्या बांधावर जान मार्गदर्शनही केले. यात लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे नियोजन करून देण्यात आले.  कारखान्याने आतापर्यंत ११ हजार एक साखर पोते उत्पादन तयार झाले आहे. कारखान्याचे संस्थापक आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (ता. तीन नोव्हेंबर) रोजी संचालक मंडळ, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  दुष्काळात एकरी ५५ टन उत्पादन या वर्षी पावसाने लातूरकडे पाठ फिरवली आहे. लातूर तालुक्यात तर सरासरी ४०८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याची टक्केवारी केवळ ५७ इतकी आहे. त्यात गेली दीड महिना पावसाने उघडीप दिली आहे. परतीचा पाऊसच झाला नाही . तरी या सें.िद्रय ऊस प्रकल्पांतर्गत लागवड करण्यात आलेल्या उसाने चांगली तग धरली. अकरा-बारा महिन्यांचा असतानाच हा ऊस गाळपाला घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरासरी एकरी ५० ते ५५ टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com