agriculture news in Marathi, Organizations demanding farmers withdrawal of fertilizer | Agrowon

खतांची दरवाढ मागे घेण्याची शेतकऱ्यांसह संघटनांची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

जळगाव : रासायनिक खतांचा वापर कमी होत आहे. परंतु, त्याच्या किमती मात्र वर्षागणिक वाढत असून, वर्षभरात संयुक्त व सरळ खतांच्या किमतीमध्ये किमान १५० ते २७० रुपयांनी गोणीमागे वाढ झाली आहे. ही दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी शेतकरी व संघटनांनी केली आहे. 

जळगाव : रासायनिक खतांचा वापर कमी होत आहे. परंतु, त्याच्या किमती मात्र वर्षागणिक वाढत असून, वर्षभरात संयुक्त व सरळ खतांच्या किमतीमध्ये किमान १५० ते २७० रुपयांनी गोणीमागे वाढ झाली आहे. ही दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी शेतकरी व संघटनांनी केली आहे. 

युरियाचे दर मागील हंगामात किंवा मे २०१८ मध्ये २६५ रुपयांपर्यंत होते. तेव्हा ५० किलोची गोणी मिळायची. आता ४५ किलोची युरियाची गोणी २६२ रुपयांना मिळते. १२.३२.१६, डीएपी, पोटॅश, १०.२६.२६, २०.२०.१४ या खतांच्या दरातही वाढ झाली आहे. १३०० रुपयांवर संयुक्त खतांचे दर पोचले आहेत. पोटॅश, युरिया ही सरळ खते लहान शेतकरी खरिपात वापरतात. दुष्काळामुळे मागील हंगामात हाती अपवादानेच आला. 
आता पुढील हंगामासाठी महागाई वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे.

डीएपीचे दर १४५० रुपये प्रतिगोणीपर्यंत आहेत. तर १२.३२.१६ चे दरही १३०० रुपयांवर आहेत. एक गोणी खरेदी करताना लहान शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांना करावाच लागतो. कारण १०० टक्के सेंद्रीय शेती अपवादानेच केली जाते. मजुरीचे दर वाढले आहेत. शेतमालाचे दर आता वधारलेले दिसत असले तरी जेव्हा शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आला होता, तेव्हा मक्‍याचे दर १५००, कापसाचे दर ५००० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. 

ज्वारी, बाजरीची खरेदी कवडीमोल दरात व्यापाऱ्यांनी मागील नोव्हेंबरमध्ये केली. खतांसोबत बियाणे पुढे घ्यावे लागेल. यामुळे खतांची दरवाढ केंद्राने मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे आत्माराम बळिराम पाटील (कापडणे, जि. धुळे) व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...