जनावरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था करा :आमदार म्हेत्रे

जनावरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था करा :आमदार म्हेत्रे
जनावरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था करा :आमदार म्हेत्रे

सोलापूर : यंदाच्या वर्षी पावसाने शेतकऱ्यांचे सगळे गणित चुकविले. त्यामुळे सगळ्यांचे डोळे सरकारकडे लागले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर आहे. त्याचबरोबर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सरकारने वेळ न घालवता लवकर करण्याची मागणी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली.  

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित सहकारमहर्षी (कै.) शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक, पशुमित्र, कृषिनिष्ठ शेतकरी, कृषिमित्र पुरस्कारांचे वितरण म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, सभापती विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, भारत शिंदे, सदस्य मदन दराडे, संजय गायकवाड, रेखा राऊत, स्वाती कांबळे, मंजुळा कोळेकर, श्रीमंत थोरात, बिभीषण आवटे, मंगल वाघमोडे, सोनाली कडते, राजेंद्र पाटील, गहिनीनाथ नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. पी. बेंदगुडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ उपस्थित होते. 

 शिंदे म्हणाले, "कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात यापुढे शेतीतील तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन ठेवा. त्यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. '' 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com