दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही
संघटित पद्धतीने होणाऱ्या कुक्कुटपालनाची उत्पादने खाल्ल्याने मानवी आरोग्याला धोका नाही, असे स्पष्टीकरण पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी दिले.
नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने कुक्कुटपालन होत असल्याने जैवसुरक्षेचे पालन व योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आढळून आलेला ‘बर्ड फ्लू’ प्रादुर्भाव हा स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आहे. त्यामुळे संघटित पद्धतीने होणाऱ्या कुक्कुटपालनाची उत्पादने खाल्ल्याने मानवी आरोग्याला धोका नाही, असे स्पष्टीकरण पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी दिले.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पसरविण्यात आलेल्या अफवा यावर शंका निरसन करण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन नाशिक विभाग यांच्या वतीने शनिवारी (ता. २३) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबूराव नरवाडे, सहायक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख, डॉ. गिरीश पाटील कुक्कुटपालन व्यावसायिक संजय देवरे, अजित फडके, डॉ. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
श्री. अहिरे म्हणाले, अफवा वाढल्याने संभ्रमातून नुकसान वाढून मागणी मंदावली. देशातील दहा कोटी घटक कुक्कुटपालन उद्योगावर अवलंबून असल्याने त्यांना हा फटका कोरोनानंतर सहन करावा लागला. मात्र, माध्यमांनी जनजागृती केल्याने मागणी पुन्हा एकदा पूर्ववत होत आहे.
डॉ. नरवाडे म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत योग्य खबरदारी घेतल्याने प्रादुर्भाव नाही. त्यामुळे शिजवलेले अंडी व चिकन मांस पूर्ण सुरक्षित आहे. अद्याप संघटित कुक्कुटपालनात अनैसर्गिक मरतुक नाही. जी मरतुक आहे ती स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आहे. कुठलीही मर होऊ नये यासाठी कुक्कुट पक्षीगृहात काटेकोर जैवसुरक्षेचे पालन करण्यात येते.
प्रशासनाकडून जनजागृती
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पुढे येत जनजागृतीचा पाठिंबा दर्शविला आहे. यासह देशी कुक्कुटपालन व्यवसायात प्रत्येक पक्षांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
- ७० अंश सेल्सिअस तापमानावर पूर्ण शिजवलेले चिकन मांस व उकडलेली अंडी खाणे पूर्णत: सुरक्षित
- अंडी हा उच्च पोषणमूल्य युक्त स्वस्त आहार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त
- बर्ड फ्लू आजार पक्षांपासून थेट मानवास होण्याची शक्यता नाही
- बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संघटित कुक्कुटपालनात नाही तर स्थलांतरित पक्ष्यांमध्ये
- 1 of 1054
- ››