agriculture news in Marathi, Organizing villages to save orchards in Nandgaon taluka | Agrowon

नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी गावबैठका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभाग सरसावला असून, याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत गावबैठका घेण्यात येत आहेत. या गावबैठकांतर्गत तालुक्यातील बाण गाव खुर्द येथील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या वस्तीवर फळबाग व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बैठक घेण्यात आली.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभाग सरसावला असून, याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत गावबैठका घेण्यात येत आहेत. या गावबैठकांतर्गत तालुक्यातील बाण गाव खुर्द येथील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या वस्तीवर फळबाग व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत तालुका कृषी अधिकारी विजय पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दुष्कळत फळबागा जिवंत ठेवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रयोगशील शेतकरी रवींद्र पाटील यांनी सिंचनाचे काटेकोर नियोजन केले आहे. त्यांच्या डाळिंबाच्या बागेला भेट देऊन प्रक्षेत्र पाहणी करण्यात आली. यानंतर श्री. पाटील यांनी उपस्थितांना याबाबत करत असलेल्या सिंचन उपाययोजनांनाबाबत माहिती दिली. या बैठकीत कृषी पर्यवेक्षक वसंत नागरे यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना याबाबत माहिती देण्यात आली. 

कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषी अधिकारी एम. ए. कुरेशी व कृषी सहाययक सतीश विंचूरकर यांनी केले. या बैठकीसाठी परिसरातील प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...