agriculture news in marathi, Osmanabad Agriculture Department Inspected due to Cold Crop singe | Agrowon

थंडीमुळे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 जानेवारी 2019

ईट, जि. उस्मानाबाद : थंडीचा पिकावर दुहेरी परिणाम झाला असून, वाढलेली थंडी गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी पोषक आहे. या पिकांना थंडीचा फायदा होईल. परंतु बदलत्या वातावरणामुळे ज्वारी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. कृषी विभागाकडून (ता. ३) गुरुवार रोजी दुपारी वाजता ज्वारी पिकांची पाहाणी करण्यात आली.

ईट, जि. उस्मानाबाद : थंडीचा पिकावर दुहेरी परिणाम झाला असून, वाढलेली थंडी गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी पोषक आहे. या पिकांना थंडीचा फायदा होईल. परंतु बदलत्या वातावरणामुळे ज्वारी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. कृषी विभागाकडून (ता. ३) गुरुवार रोजी दुपारी वाजता ज्वारी पिकांची पाहाणी करण्यात आली.

मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, कृषी पर्यवेक्षक जीवन राऊत यांनी आंद्रुड (ता. भूम) मारुती लिमकर यांच्या शेतातील ज्वारीची पाहणी केली. या रोगाच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष द्यावे. वाढलेल्या थंडीसाठी फळपिके तुलनेने अधिक संवेदनशील असतात. सध्या ज्वारी अनेक ठिकाणी हुरड्याच्या स्थितीत आहे. या वाढलेल्या थंडीमुळे पहाटे धुके आणि दव पडल्यास ज्वारीवर चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 

सकाळी धुके पडणाऱ्या भागात ज्वारीच्या कणसावर काळी बुरशी वाढून त्याचा परिणाम दाण्यांच्या प्रतीवर होवून काळे दाणे पडल्यास अशा ज्वारीची प्रत खराब होऊन बाजारात भाव कमी मिळू शकतो.  उशिरा पेरलेल्या ज्वारीवर सध्या पाहणी केली असता पिकाची पाने करपली आहेत. शक्‍य असल्यास तुषार संचने पाणी दिल्यास ज्वारी पूर्ववत होण्यास मदत होइल. कडाक्‍याच्या थंडीमुळे तापमानात मोठी घट झाली. हे तापमान नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपआपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

शेकोटी पेटवणे, रात्री पाणी देणे इ. मुळे घटलेले तापमान काही प्रमाणात का होईना नक्कीच नियंत्रित करता येईल व होणारे नुकसान कमी करता येईल, असे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

‘ज्वारी पिकाला रात्री किंवा पहाटेच्या वेळी तुषार सिंचनाने पाणी द्यावे. शेतात ओला काडीकचरा, गवत जाळून धूर करावा. बहुतांश सर्व पिकांमध्ये रात्रीच्या वेळी पाणी दिल्यास पिकांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते’. 
- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी 
 


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...