agriculture news in marathi In Osmanabad district Rain with gusts of wind | Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

तुरोरी, जि. उस्मानाबाद : सीमावर्ती भागातील दगड धानोरा, मळगीवाडी, गुरूवाडी, मळगी आदी गावांत शुक्रवारी (ता १४) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

तुरोरी, जि. उस्मानाबाद : सीमावर्ती भागातील दगड धानोरा, मळगीवाडी, गुरूवाडी, मळगी आदी गावांत शुक्रवारी (ता १४) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

गेल्या आठवड्यातही या परिसरात वादळीवाऱ्यासह मोठा पाऊस पडला होता. परत शुक्रवारी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे दगड धानोरा येथे काही झाडे पडली. कडब्याच्या गंजीही उडून गेल्या. तर धानोरासह मळगीवाडी येथील घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणालाही जखम झाली नाही. भाजीपाला, आंबे व केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस कमी होता. मात्र, वारे प्रचंड वेगाने वाहत होते.

जालना, लातूरमध्येही हजेरी

जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरात शनिवारी (ता. १५) सकाळी सहा वाजता अचानकपणे पाऊस सुरू झाला. सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी दूध वाटप करणाऱ्या शेतकऱ्यांची दैना झाली. २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वातावरणात उकाडा कायम होता. या वेळी आलेल्या पावसामुळे शेत नांगरणीच्या कामात व्यत्यय आला. वाळत ठेवलेल्या वाळवण पावसामुळे जमा करताना महिलांची दमछाक झाली. कुंभार पिंपळगाव  परिसरातही शनिवारी पहाटे अर्धा तास पाऊस झाला.

दरम्यान लातूर जिल्ह्यातील बेलकुंड (ता.औसा) येथे वादळी वाऱ्यासह पडलेल्या रिमझिम पावसात पत्रे उडाले.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...