उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

उस्मानाबाद : यंदाच्या खरीप हंगामात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात १० जुलै अखेरपर्यंत नियोजित क्षेत्राच्या तुलनेत अनुक्रमे १९ व ३४ टक्‍केच पेरणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाल्याचे कृषी विभागाचा पेरणी अहवालातून समोर आले. लांबलेल्या व पेरणीयोग्य न पडलेल्या पावसाने दोन्ही जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीला ब्रेक लावला असून उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात यंदा ६ लाख २४ हजार ८६५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी नियोजित होती. १० जुलैपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १८९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ज्वारीच्या ६३ हेक्‍टर क्षेत्रासह मक्याचे २७८२ हेक्‍टर, तुरीचे १९६६७ हेक्‍टर, मुगाचे १८१८ हेक्‍टर, उडदाचे १४३६, सोयाबीन ८८ हजार ५०२, तर कपाशीच्या ५०६३ हेक्‍टरवरील पिकाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा ४ लाख १२ हजार ९७० हेक्‍टरवर पेरणी नियोजित होती. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ १ लाख ४३ हजार २२० हेक्‍टरवर पेरणी झाली. पेरणी क्षेत्रात ज्वारीचे १४६८ हेक्‍टरवरील क्षेत्रासह मका ७६९, तुर १६४२९ , मुग ६९४२, उडीद १२६३४, सोयाबीन ९६ हजार २८६, तर कपाशीच्या ३११८ हेक्‍टरवरील खरीप पिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.

उडीद, मुगाचा निम्म्यापेक्षाही कमी पेरा

लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात उडदाची १ लाख १५ हजार ४१८ हेक्‍टरवर पेरणी नियोजित होती. बुधवारअखेरपर्यंत प्रत्यक्षात ३० हजार २८३ हेक्‍टरवर अर्थात नियोजित क्षेत्राच्या तुलनेत केवळ २६.२४ टक्‍के क्षेत्रावरच उडदाची पेरणी झाली आहे. दुसरीकडे मुगाची १ लाख ११ हजार ४७८ हेक्‍टरवर नियोजित क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३५ हजार १७१ हेक्‍टरवर अर्थात ३१.५५ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली. पेरणीच्या प्रचलीत कालावधीनुसार उशीरा ७ जुलैपर्यंत मुग, उडीदाची पेरणी करता येउ शकते. तो कालावधी आता निघून गेला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com