पोकराच्या लाभार्थ्यांना इतर योजनांचा लाभ नाही

POCRA project
POCRA project

बुलडाणा ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात निवडलेल्या गावांमध्ये इतर योजनांमधून लाभ दिला जाऊ नये, असे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे भविष्यात पोकरात असलेल्या गावांतील लाभार्थ्यांना इतर योजनांपासून वंचित राहावे लागू शकते. याबाबत अधिक असे की, राज्यातील १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४४१ गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामध्ये पाणलोटाची कामे वगळता वैयक्तिक व गटांना द्यावयाच्या लाभासाठी प्रकल्पांतर्गत अत्यल्प व अल्पभूधारक लाभ दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग अशा क्रमाने प्राधान्य दिले जाते.  या प्रकल्पाच्या सुकाणू समितीने घेतलेल्या बैठकीत प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये अन्य योजनेतून खर्च केल्यास होणारी द्विरुक्ती टाळण्यासाठी यापुढे पोकरातील गावांमधील लाभार्थ्याची कृषी विभागाच्या प्रचलित योजनेसाठी निवड करू नये असे म्हटले आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानुसार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना व इतर योजनेमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या निवडलेल्या ४४१ गावांतील लाभार्थ्यांचा समावेश करू नये, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com