Agriculture news in marathi Otherwise ‘leave the rats’ movement | Agrowon

..अन्यथा ‘उंदीर छोडो’ आंदोलन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

नाशिक : ‘‘शेतकऱ्यांना मुदत न देता रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा महावितरणकडून प्रयत्न झाल्यास कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कार्यालयात उंदीर सोडून आंदोलन करू’’, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेने दिला.

नाशिक : ‘‘महावितरणच्या कळवण विभागाच्या आदेशानुसार देवळा उपविभागांतर्गत प्रत्येक गावात कृषीपंप वीज बिल भरा. अन्यथा, रोहित्र कट करण्याची अनागोंदी मोहीम सुरू आहे. हा नियमबाह्य प्रकार अशोभनीय आहे. जर शेतकऱ्यांना मुदत न देता रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा महावितरणकडून प्रयत्न झाल्यास कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कार्यालयात उंदीर सोडून आंदोलन करू’’, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेने दिला. 

कोरोना संकटामुळे शेतकरी आधीच नेस्तनाबूत झाला आहे.अशातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. थोडासा पाऊस पडला, तर उसनवारी करून शेतीत पेरण्या करत आहेत. अशा परिस्थितीत विद्युत वितरण कंपनी रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

कांदा भावाच्या चढ-उतारामुळे शेतकरी हतबल आहे. महावितरणने मात्र वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्व सूचना देऊन १५ दिवसांची मुदत नोटीस बजावण्यात यावी. नंतरच वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी आहे.  मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंत्यांसह तहसीलदार दत्ता शेजुळ देवळा यांना देण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...