..अन्यथा अक्कलकुवा तालुक्यात वीज कंपनीच्या कार्यालयाला घेराव

वाण्याविहीर, जि. नंदुरबार ः वीजबिल वसुलीच्या नावाखाली अक्कलकुवा तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
 ..Otherwise besiege the office of the power company in Akkalkuwa taluka
..Otherwise besiege the office of the power company in Akkalkuwa taluka

वाण्याविहीर, जि. नंदुरबार ः वीजबिल वसुलीच्या नावाखाली अक्कलकुवा तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर शेतातील पिकेदेखील संकटात सापडले आहे. या समस्येविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली तालुक्यात १ नोव्हेंबरला वीज वितरणाच्या अक्कलकुवा कार्यालयात घेराव आंदोलन करण्यात येईल.  

वीजपुरवठा करताना अक्कलकुव्यातील वीज वितरणचे कर्मचारी नेहमीच मनमानी कारभार करतात. वसुलीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करीत नागरिकांना अडचणीत आणत आहेत. कोरोनाच्या संकटाने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले, त्यांच्यावर ऑनलाइन शिक्षण लादले गेले. परंतु त्यातही वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तेही संकटात सापडले आहे. वीज वितरणाच्या या भूमिकेमुळे सर्वच घटक प्रभावित झाले. ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अक्कलकुवा कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन भाजपचे अ. ज. सेलचे राज्य उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी दिली. 

पीक कापणीची कामे सुरू झाली असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दुसऱ्या बाजूने रब्बी हंगामाची शेतीकामे सुरू झाली. या कामांसाठीही निव्वळ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सुविधा असूनही संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे म्हटले जात आहे. 

‘डिजिटल इंडिया’ नावापुरतेच

मोलगी (ता. अक्कलकुवा) भागातील नागरिकांना भ्रमणध्वनीची सेवा देणाऱ्या कंपन्यांचे सर्वच टॉवर अपेक्षित वीजपुरवठा केला जात नसल्याने बंद पडतात. त्यामुळे आधुनिकीकरणातील कुठलीच ऑनलाइन कामे मार्गी लावता येत नाहीत. शासनामार्फत ऑनलाइन सेवेला प्राधान्य दिले जात असले, तरी मोलगी भागात ही कामे होत नाहीत. त्यामुळे या भागापुरती का असेना डिजिटल इंडिया, ही बाब खोटी ठरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com