अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार : रविकांत तुपकर

केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ घालायचा, तो घालावा. पण येत्या दोन-तीन दिवसांत ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी.
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार  Otherwise Swabhimani will take to the streets
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार  Otherwise Swabhimani will take to the streets

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ घालायचा, तो घालावा. पण येत्या दोन-तीन दिवसांत ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी. नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.  १६ आणि १७ तारखेला जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील राहिले सुरले सर्व पीक उद्धवस्त झाले. शेतांमधील कापूस गेला, सोयाबीन गेले आणि शेतांमध्ये नद्या, नाले तयार झाले. शेतकरी ढसाढसा रडतो आहे, तरी राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. राज्य सरकारने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी आहे आणि अद्याप ती मिळाली सुद्धा नाही. याआधीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आताही अतिवृष्टी झाली. राज्य सरकार असो की केंद्र सरकार दोघांनाही शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय पळ काढता येणार नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले.  केंद्राने मन मोठे करावे, राज्याने पुन्हा एकदा मोठे मन करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. केंद्रीय मंत्री असो वा राज्यातील मंत्री यांना आता पळ काढता येणार नाही. त्यामुळे त्यांना आता पळवाटा शोधणे बंद करावे. सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे आणि कुठल्याही अटी, शर्ती न लावता तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तिजोरीत पैसा नाही, ही सबब सांगणे आता बंद केले पाहिजे. कारण या जबाबदारीतून सरकारला हात झटकता येणार नाही. शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतो आहे. त्यांनातरी मायबाप सरकारशिवाय कोण वाली आहे, असा प्रश्‍न तुपकर यांनी उपस्थित केला. 

मदत तोकडी, हे सरकारलाही कबूल  अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे, ही बाब सरकारलाही कबूल आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या आठवड्यात तशी कबुली दिली. हे सर्व जर माहिती आहे, तर मदत वाढवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले, असा सवाल तुपकरांनी विचारला. सरकारचे आर्थिक स्त्रोत वाढल्यावर आम्ही पुन्हा मदत देऊ. तर मग आत्ता का नाही वाढविले जात स्त्रोत? त्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्याच झाल्या पाहिजेत का? विष पिऊन, फासावर लटकून शेतकरी मेल्यावर तर करताच ना मदत, मग आता जिवंतपणी तो आस लावून बसला असताना मदतीसाठी तुमचे हात का पुढे येत नाही, असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com