Agriculture News in Marathi Otherwise Swabhimani will take to the streets | Page 4 ||| Agrowon

अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार : रविकांत तुपकर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ घालायचा, तो घालावा. पण येत्या दोन-तीन दिवसांत ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी.

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ घालायचा, तो घालावा. पण येत्या दोन-तीन दिवसांत ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी. नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 

१६ आणि १७ तारखेला जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील राहिले सुरले सर्व पीक उद्धवस्त झाले. शेतांमधील कापूस गेला, सोयाबीन गेले आणि शेतांमध्ये नद्या, नाले तयार झाले. शेतकरी ढसाढसा रडतो आहे, तरी राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. राज्य सरकारने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी आहे आणि अद्याप ती मिळाली सुद्धा नाही. याआधीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आताही अतिवृष्टी झाली. राज्य सरकार असो की केंद्र सरकार दोघांनाही शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय पळ काढता येणार नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले. 

केंद्राने मन मोठे करावे, राज्याने पुन्हा एकदा मोठे मन करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. केंद्रीय मंत्री असो वा राज्यातील मंत्री यांना आता पळ काढता येणार नाही. त्यामुळे त्यांना आता पळवाटा शोधणे बंद करावे. सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे आणि कुठल्याही अटी, शर्ती न लावता तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तिजोरीत पैसा नाही, ही सबब सांगणे आता बंद केले पाहिजे. कारण या जबाबदारीतून सरकारला हात झटकता येणार नाही. शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतो आहे. त्यांनातरी मायबाप सरकारशिवाय कोण वाली आहे, असा प्रश्‍न तुपकर यांनी उपस्थित केला. 

मदत तोकडी, हे सरकारलाही कबूल 
अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे, ही बाब सरकारलाही कबूल आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या आठवड्यात तशी कबुली दिली. हे सर्व जर माहिती आहे, तर मदत वाढवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले, असा सवाल तुपकरांनी विचारला. सरकारचे आर्थिक स्त्रोत वाढल्यावर आम्ही पुन्हा मदत देऊ. तर मग आत्ता का नाही वाढविले जात स्त्रोत? त्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्याच झाल्या पाहिजेत का? विष पिऊन, फासावर लटकून शेतकरी मेल्यावर तर करताच ना मदत, मग आता जिवंतपणी तो आस लावून बसला असताना मदतीसाठी तुमचे हात का पुढे येत नाही, असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारला.  

 
 


इतर बातम्या
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...