Agriculture news in marathi; Our situation here in the Mahayuti is well over | Agrowon

महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर : जानकर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो तरी मी भाजपसोबत आहे, त्याला कारण म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वच सकारात्मक झालं, असं मी म्हणत नाही. निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास आहे.’’ असे मत व्यक्त करताना महायुतीत आमची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ असे सांगत स्वतःला सावरून घेत अधिक बोलणे टाळले. 

नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो तरी मी भाजपसोबत आहे, त्याला कारण म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वच सकारात्मक झालं, असं मी म्हणत नाही. निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास आहे.’’ असे मत व्यक्त करताना महायुतीत आमची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ असे सांगत स्वतःला सावरून घेत अधिक बोलणे टाळले. 

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जानकर बुधवारी (ता. १६) नाशिकला आले होते. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर माझा विश्‍वास आहे. ‘रासप’ला मुख्यमत्र्यांकडून कोणतही आश्‍वासन मिळाले नाही, फक्त विकास या मुद्द्यावर महायुतीत सामील झालो आहोत. महायुतीत बंडखोरी झाल्याची कबुली देताना सर्वच पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई करण्याची युतीच्या नेत्यांची भूमिका आहे. रासप व भाजपमध्ये भांडण असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटते. परंतु, आमची भांडणे ही घरातली आहेत व ती मिटलीदेखील. महात्मा फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा, या मागणीवर रासप ठाम असून, केंद्र सरकारला तशी शिफारस करण्यात आली आहे. महायुतीमध्ये सर्वांत ताकदवान भाजप असल्याने त्या अर्थाने सगळ्यांचा मोठा भाऊ असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाना शिलेदार, पवन भगुरकर आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...