agriculture news in Marathi Our student pass within six months Maharashtra | Page 2 ||| Agrowon

आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला : शरद पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. शरद पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला विद्यार्थी मानले आहे. 

मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. शरद पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला विद्यार्थी मानले आहे. 

शिवसेना नेते  संजय राऊत  यांनी घेतलेल्या मुलाखतीत श्री. पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही भाष्य केले. या सरकारचे सहा महिन्यांचे प्रगती पुस्तक तुमच्याकडे आलंय का? असा सवाल राऊत यांनी गेला.

त्यावर ‘‘आता ही सहा महिन्यांची परीक्षा झाली असून अंतिम परीक्षा पूर्ण झाल्याचे वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे, असे सांगतानाच आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय.’’ तुम्ही मोदींचे गुरु आहात का? असा प्रश्न विचारला असता श्री. पवार म्हणाले ‘‘मला मोदींचा गुरु म्हणून त्यांना आणि मला दोघांनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कोणी कोणाचा गुरु असत नाही. आम्ही लोक अनेकदा एकमेकांच्या संदर्भात सोयीची भूमिका मांडत असतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ’’

‘‘केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे. नोटा छापण्याचा अधिकार आहे. जागतिक बँक व आशियाई बँकेकडून कर्ज उभारण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रसंगी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज काढून राज्य स्थिरस्थावर करण्याची भूमिका केंद्राने घेतली पाहिजे,’’ अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझे मागील अनेक वर्षांपासूनचे मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरे संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. यापूर्वी जॉर्ज फर्नांडीस यांनी देखील संरक्षण मंत्री असताना चीन हा पाकिस्तानपेक्षा चीन मोठा शत्रू असल्याचे म्हटलं होते, तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली होती, याकडे श्री. पवार यांनी लक्ष वेधले.

देशाला मनमोहन सिंग यांची गरज
यावेळी शरद पवार म्हणाले की,  आज देशाला मनमोहन सिंह यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. मनमोहन सिंहांनंतर मी नरसिंहरावांना श्रेय देतो. कारण या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. अशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पावले टाकण्याची काळजी घ्यावी आणि त्या गोष्टींसाठी माझी खात्री आहे की, देश सहकार्य करेल.


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...