रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे तुडूंब

धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ६५ धरणांपैकी ४८ धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांपैकी बहुतांश धरणात ८० ते ९० टक्के पाणीसाठा आहे. रत्नागिरीतील शीळ धरण देखील १०० टक्के भरले आहे.
Out of 65 dams in Ratnagiri district, 48 dams have been breached
Out of 65 dams in Ratnagiri district, 48 dams have been breached

रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला असून धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ६५ धरणांपैकी ४८ धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांपैकी बहुतांश धरणात ८० ते ९० टक्के पाणीसाठा आहे. रत्नागिरीतील शीळ धरण देखील १०० टक्के भरले आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ९.४२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ९, दापोली ९.४०, खेड १२.४०, गुहागर ७.८०, चिपळूण ७.१०, संगमेश्‍वर १६.६०, रत्नागिरी ९.४०, लांजा ८.७०, राजापूर ४.४० मिमीची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात पाऊस पडलेला नाही. शनिवारी रात्री पावसाची हलकी सर पडली होती.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस कोसळल्याने पाटबंधारे मंडळाची बहुतांश धरणे ओसंडून वाहत आहेत. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामदेखील अंतिम टप्प्यात आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने काही धरणं १०० टक्के भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील ४, दापोली ५, खेड ६, चिपळूण ८, गुहागर १, संगमेश्वर ६, रत्नागिरी १, लांजा तालुक्यातील १० तर राजापूरमधील ६ अशी जिल्ह्यातील ३४ धरणं १०० टक्के भरली आहेत.

शंभर टक्के भरलेली धरणे मंडणगड ः पणदेरी, तिडे, भोळवली, तूळशी दापोली ः शिरसाडी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, पंचनदी खेड ः शिरवली, शेलडी, पिंपळवाडी, तळवट, कोंडीवली, कुरवल गुहागर ः गुहागर चिपळूण ः फणसवाडी, मालघर, कळंवडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, असुरडे   संगमेश्वर ः तेलेवाडी, कडवई, गडनदी, गडगडी, रांगव, निवे, मोर्डे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com