सांगलीतील ८४ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प कोरडे

सांगलीतील ८४ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प कोरडे
सांगलीतील ८४ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प कोरडे

सांगली ः जिल्ह्यात पाटबंधारे विभागाचे ५ मध्यम आणि ७९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट असून सध्या ८४ प्रकल्पात १४९४.२५ दशलक्ष घन फूट म्हणजे केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ८४ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प कोरडे आहेत. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांनी योजना सुरू असताना लाभ क्षेत्रातील तलाव भरून देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश पाटबंधारे विभागाने पाळले नसल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसते आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करून पाणी देण्याचे नियोजन झाले. मात्र, पाणीपट्टी भरली नसल्याने योजना सुरू होण्यास विलंब झाला. योजना सुरू झाल्या. पण पाणी देण्याचे वेळापत्रकच नेटके नसल्याने शेतीला पाणी मिळाले नाही. 

त्यातच दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक डिसेंबरमध्ये येणार असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि काही प्रमाणात शेतीसाठी पाणी योजनांच्या माध्यमातून तलाव भरून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने काही तलावात पाणी भरले. पण त्यानंतर या तिन्ही योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलाव आजही कोरडे पडले असल्याचे चित्र आहे. केवळ दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला दाखविण्यासाठी योजनेतून तात्पुरते पाणी दिले असा भास करून दिला असल्याची चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे.  

तालुकानिहाय मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घन फूट)
तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
तासगाव ५३.९२ १० टक्के
खानापूर ७३.३० १३ टक्के
कडेगाव ३०५.७३ ४८ टक्के
शिराळा ६२८.९६ ७१ टक्के
आटपाडी १३ १४९.१७ १३ टक्के
जत २८ १५५.५२ ५ टक्के
कवठेमहांकाळ ११ ७७.७८ ९ टक्के
मिरज ३०.०५ २५ टक्के
वाळवा १९.८१ २३.१७ टक्के
एकूण ८४ १४९४.२५ १९ टक्के  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com