Agriculture news in marathi out of Twenty-five quintals cotton in sold only 15 returned | Agrowon

पंचवीस क्विंटल कापूस विक्रीला नेला अन् १५ परत आला 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

अकोला ः यंदासारखी कापूस उत्पादकांची कधीही दुरवस्था झाली नाही. सध्या शासनाने कापूस खरेदी सुरू केली खरी मात्र, या केंद्रावर खरेदीपेक्षा कापूस परत करण्याच्याच घटना अधिक होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. ‘मी २५ क्विंटलची ट्रॉली विक्रीला नेली. ग्रेडरने १० क्विंटल कापूस घेतला आणि राहलेला परत केला.’ शेतकरी ही व्यथा सांगत होता. बोरगावमंजू येथील केंद्रावर घडलेला हा प्रकार आहे. 

अकोला ः यंदासारखी कापूस उत्पादकांची कधीही दुरवस्था झाली नाही. सध्या शासनाने कापूस खरेदी सुरू केली खरी मात्र, या केंद्रावर खरेदीपेक्षा कापूस परत करण्याच्याच घटना अधिक होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. ‘मी २५ क्विंटलची ट्रॉली विक्रीला नेली. ग्रेडरने १० क्विंटल कापूस घेतला आणि राहलेला परत केला.’ शेतकरी ही व्यथा सांगत होता. बोरगावमंजू येथील केंद्रावर घडलेला हा प्रकार आहे. 

पणन महासंघातर्फे बोरगाव येथे खरेदी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी राजाभाऊ देशमुख यांनी आधीच नोंदणी केलेली असल्याने कापसाची ट्रॉली भरून विक्रीला नेली. यात जवळपास २५ क्विंटल कापूस होता. केंद्रावर ग्रेडरने पाहणी करून यातील १० क्विंटल कापूस स्वीकारला. उर्वरित कापूस परत न्यायला लावला. यंदा कापूस वेचाई १० रुपये किलोने केलेली आहे. त्यानंतर ट्रॉलीचे भाडे, मजुरी, मशागत, लागवडीसह व्यवस्थापनावर खर्च झाला आहे. आता कापूस विक्रीला नेला तर अर्धाही घेतला नाही, असे देशमुख म्हणाले. 

यंदा जास्तीचा पाऊस झाल्याने तसेच वेचणीच्या काळातही पाऊस आल्याने कापसाचा दर्जा घसरला होता. त्यामुळे मोजकाच कापूस ग्रेड एकमध्ये बसेल असा झालेला आहे. सर्वच कापूस उत्पादकांची ही गत आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस विक्री करण्याचा पेच झालेला आहे. शासनाच्या खरेदी केंद्रावरून नाकारलेला कापूस बाहेर व्यापाऱ्यांना विकायचा तर तीही सोय सध्या उपलब्ध नाही. लॉकडाऊनमुळे खासगी खरेदी पूर्णतः ठप्प झालेली आहे. त्यामुळे हा कापूस कसा विकावा, अशी चिंता कापूस उत्पादकांना लागलेली आहे. 

मी सोमवारी २५ क्विंटल कापूस विक्रीला नेला होता. त्यापैकी १० क्विंटल घेत १५ क्विंटल परत पाठवण्यात आला. माझ्याकडे अद्याप अशा प्रकारचा ७५ क्विंटल कापूस पडून आहे. आता तो कोणाला विकायचा. शासनाने विविध प्रकारच्या ग्रेड तयार करून त्यानुसार दर द्यावा. परंतु सर्व कापूस घ्यावा, अशी तमाम कापूस उत्पादकांची मागणी आहे. 
- राजाभाऊ देशमुख, शेतकरी, बोरगावमंजू, ता. जि. अकोला 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...