Agriculture news in marathi Outbreak of american form army worm on maize in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात असलेली लष्करी अळी सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.

देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात असलेली लष्करी अळी सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अळी पाने फस्त करीत असून, पिकाची स्थिती बिकट बनत आहे.

यंदा अळीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. अनेक शेतकरी मका लागवडीला प्राधान्य देतात. धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यातही मका पीक असते. मागील महिन्यात वेळेत पेरणी झाली. लागवड सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवर झाली आहे.  अळीच्या प्रादुर्भावामुळे पीकसंरक्षणाचा खर्च वाढत आहे. एकरी एका फवारणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च मजुरीसह येत आहे. सुरवातीला अळीचा शिरकाव दिसत नव्हता. परंतु, महिनाभरानंतर हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. धुळे तालुक्यातील देऊरसह इतर भागात अळीमुळे पिकांचे ५० ते ७० टक्क्यांवर नुकसानही झाले.

रब्बीमध्ये मक्याला अपेक्षित दर मिळाला नाही. आता पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पानांना छिद्रे  पडून ती पांढरी, पिवळी होत आहेत. शेतकऱ्यांनी एकदा किडनाशकांची फवारणी केली. पुन्हा फवारणीची तयारी करावी लागत आहे.

प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून सुरवातीपासून कार्यवाही झाली नाही. कामगंध सापळ्यांचे मोफत वितरण करण्याची मागणी होत आहे. मका पिकाच्या पोंग्यात टाकण्यासाठी आवश्‍यक किडनाशकांचे वितरणही व्हायला हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...