Agriculture News in Marathi Outbreak of bollworm in Jalgaon district | Page 4 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

जळगाव जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अगोदर मारले. आता शिल्लक कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अगोदर मारले. आता शिल्लक कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

आगामी खरीप हंगामातील कपाशीवर बोंडअळी येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना आता शेतात असलेली कपाशी उपटून फेकल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषीरथ गावागावांतून काढण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोंडअळीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अविनाश काबरा, सुशिल सोनवणे आदी उपस्थित होते.
 
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत बियाणे कंपन्यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते अनावरण झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेला पाऊस व लांबलेल्या कालावधीमुळे कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्‍यता आहे. 

प्रतिक्रिया

सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी कापूस पिकावर अनावश्यक कीडकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पऱ्हाट्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. हेच खत टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढेल. 
-संभाजी ठाकूर, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

बोंडअळीवर विविध उपाययोजना सुरू
    बाधित कपाशी उपटून फेकण्याची वेळ
    शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीबाबत जनजागृतीसाठी कृषीरथ
    जागृतीसाठी कृषीरथ गावागावांतून काढण्याचे नियोजन 
    पुढी हंगामातही किडीचा प्रादूर्भाव होण्याची भीती
    कापूस पिकाचा फरदड न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

इतर बातम्या
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...
जळगाव जिल्ह्यात ओल्या दुष्काळाच्या...जळगाव ः  अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे...
दुधाला भाव व बाजारपेठ मिळवून देणार :...वर्धा : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था ही...
कोल्हापूर : ‘एफआरपी’चा वाढीव रक्कम न...कोल्हापूर : गेल्या हंगामात तोडणी वाहतूक खर्च कमी...
अकोलाः करपा रोगाचा केळीला फटका पणज, जि. अकोलाः जिल्ह्यात पणज, बोचरा, शहापूर,...