agriculture news in marathi Outbreak of Bond larvae on dryland cotton in Khandesh | Agrowon

खानदेशात कोरडवाहू कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

जळगाव : खानदेशात प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोठे नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत आहेत.

जळगाव : खानदेशात प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोठे नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान होत असल्याने क्षेत्र रिकामे करून कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले  शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहेत. 

कोरडवाहू कापूस जळगावच्या पश्चिम पट्ट्यात अधिक असतो. त्यात अमळनेर, पारोळा, पाचोरा, चोपडा यांचा समावेश आहे. धुळ्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा येथेही कोरडवाहू कापसाचे क्षेत्र अधिक आहे. खानदेशात एकूण सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. सर्वच तालुक्यांमध्ये कापूस प्रमुख पीक आहे.

दोन वेचण्या कोरडवाहू कापूस पिकात झाल्या आणि गेल्या महिन्यातच गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला. सध्या बोंडे उमलत नाहीत. अर्धवट उमललेली बोंडे वेचणीला खर्च प्रतिक्विंटल एक हजार रुपयांवर येत आहे. 
मजूर मिळत नाहीत. कापसाला हवा तसा दर नाही. एकरी फक्त एक ते दोन क्विंटल उत्पादन काही शेतकऱ्यांना आले आहे.

अशातच गुलाबी बोंड अळीने पिकाला ग्रासल्याने शेतकरी संकटात आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी कापूस उत्पादक नजीकच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेत आहेत. तसेच 
ज्यांच्याकडे कृत्रीम जलसाठे उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांनी क्षेत्र रिकामे करून त्यात गहू, मका पेरणी सुरू केली आहे. या स्थितीत क्षेत्र झपाट्याने रिकामे होईल. कारण, अळीचा प्रादुर्भाव सर्वत्र आहे. 

पंचनामे करण्याची मागणी

गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी नव्याने उपाययोजना करणे खर्चिक आहे. खर्च करणे सध्या शक्य नाही. कारण, हाती पैसा नाही. बोंड अळीसंबंधी पंचनामे करून पुढे नुकसान भरपाई मिळण्याची मागणीदेखील केली जात आहे. 

यंदा दोन-तीन वेचण्यानंतरच गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. कोरडवाहू कापसाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मजुरी खर्च वाढला आहे. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द (जि. जळगाव)


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...