agriculture news in marathi Outbreak of conch snail in soybean in Osmanabad district | Page 3 ||| Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता. औसा) परिसरासह येडशी (ता.उस्मानाबाद) येथे सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता. औसा) परिसरासह येडशी (ता.उस्मानाबाद) येथे सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

मंडळ कृषी अधिकारी बेलकुंड यांच्या पथकाने विविध प्लॉटला भेटी देत नियंत्रण व्‍यवस्‍थापन करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत गुरुवारी (ता. २२) चर्चा केली. या वेळी कृषी पर्यवेक्षक विकास लटूरे यांनी याबद्दलची उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितली.

लटुरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी बांध स्वच्छ ठेवावेत. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी करावी. शंखी प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. शेताभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा टाकावा.``  

झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. मेटाल्डिहाईड या रसायनाचा वापर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करावा. शिफारशीत कीटकनाशक, पाणी, गूळ, गव्हाचा अथवा भाताचा कोंडा या मिश्रणाचे आमिष तयार करावे. ते शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. या 
आमिषापासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. यावेळी कृषी अधिकारी गणेश राऊत, कृषी सहायक आशिष काळदाते उपस्थित होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...
कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत...