Outbreak of 'Karpa' on soybean crop in Marathwada
Outbreak of 'Karpa' on soybean crop in Marathwada

मराठवाड्यात सोयाबीन पिकावर ‘करपा’चा प्रादुर्भाव

परभणी : सततच्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागातील सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

परभणी : सततच्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागातील सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. इतरही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याची गरज आहे,’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठतील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे करण्यात आले.

रोगाची लक्षणे, नुकसान

करपा हा रोग कोलोटोट्रीकम बुरशीमुळे (Collototrichum truncatum) होतो. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.  त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो. त्याचा बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो.

असे करा व्यवस्थापन

या रोग नियंत्रणासाठी इतर निरोगी सोयाबीन पिकांवर पसरु नये म्हणून कार्बेन्डाझिम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के) २५० मिली प्रति एकर फवारावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने दुसरी फवारणी करावी. विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे ही माहिती देण्‍यात आली.

अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या कृषि माहिती वाहिनीच्या (०२४५२) २२९००० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com