Agriculture news in marathi Outbreaks appear to be exacerbated during sugarcane and fodder crops in Parbhani | Page 2 ||| Agrowon

परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या नाकतोड्याचा प्राद्रुर्भावाची पाहणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.६) केली. यावेळी या किडीच्या व्यवस्थापनाचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. 

परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या नाकतोड्याचा प्राद्रुर्भावाची पाहणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.६) केली. यावेळी या किडीच्या व्यवस्थापनाचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. 

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विभागात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. काही ठिकाणी ऊस, मका, ज्वारी, कापूस आदी पिकांवर त्याचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत आढळून आले. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत बडगुजर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी के. एम. जाधव यांच्या पथकाने गुरुवारी (ता.६) वांगी येथील ऊस आणि चारा पिकांची पाहणी केली.

त्यावेळी ठराविक शेतावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर ऊस मका, चारा पिकांवर या किडींचा उद्रेक होउ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या किडींचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी वेळीच करणे आवश्यक आहे. 

असे करा व्यवस्थापन

नाकतोड्याने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी शोधून सामुहिकरित्या नष्ट करावीत. सुरुवातीच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्याने निमतेल अडीच लिटर प्रति हेक्टरी या प्रमाणे फवारणी करावी. या किडींसाठी केंद्रिय कीटकनाशक मंडळाकडून कुठल्याही कीटकनाशकाची शिफारस नाही. परंतु, केंद्रिय किटकनाशक मंडळ तसेच नोंदणी समितीने टोळकिडींसाठी शिफारस केलेली कीटकनाशके नाकतोड्यांसाठी सुध्दा प्रभावी ठरु शकतात. परंतु, शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा. चारापिकांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. 

नाकतोड्याचा मराठवाड्यातील संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी या किडीबाबत जागरुक रहावे. प्रादुर्भाव दिसून येताच सजगपणे किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन किटकशास्त्र विभागातर्फे आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...