पुरातील नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार

पुरातील नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार
पुरातील नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार

सोलापूर : पुरामुळे नादुरुस्त झालेले वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. जिल्ह्यातील काही भागांतील पूरस्थितीमुळे १३१ वीजवाहिन्यांच्या वीजपुरवठ्यावर अंशतः परिणाम झाला आहे. धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागांत पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १९३६ अशा एकूण १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह सुमारे २१९०० ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे.

पुराच्या पाण्याचा धोका निवळताच या रोहित्रांचा वीजपुवरठा सुरू करण्यात येईल. अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देईल. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूर परिस्थिती निवळताच करण्यात येईल. 

पावसामुळे अनेक भागांत बिकट परिस्थिती असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. प्रसंगात ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com