सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज ग्राहकांकडे थकबाकी

दोन लाख वीज ग्राहकांकडे थकबाकी
दोन लाख वीज ग्राहकांकडे थकबाकी

सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. 

जिल्ह्यातील अकलूज विभागात २७ हजार ३५५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे वीजबिलापोटी तीन कोटी ६२ लाख, बार्शी विभागात ६१ हजार २४५ ग्राहकांकडे नऊ कोटी ७६ लाख, पंढरपूर विभागात ६५ हजार ३५५ ग्राहकांकडे नऊ कोटी ८१ लाख, सोलापूर शहर विभागात ६३ हजार २७५ ग्राहकांकडे ११ कोटी ६२ लाख, सोलापूर ग्रामीण विभागात ७० हजार ४१५ ग्राहकांकडे ११ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे.  वांरवार आवाहन करून, नोटीस पाठवूनही वीजबिलांची थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

महावितरणकडून सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीमची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मीटर रिडिंगचे वाचन दरमहा ठरावीक दिवशी व वीजग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. वीजबिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींची माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविली जाते. सोबतच छापील वीजबिलसुद्धा योग्य वेळेत पाठविले जाते.

याशिवाय एसएमएसद्वारे वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश पाठविला जातो. त्यामुळे बिलिंगमधील तक्रारींचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अतिशय कमी झाले आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com