Agriculture news in marathi, Outstanding to two lakh electricity consumers in Solapur | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज ग्राहकांकडे थकबाकी

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. 

सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. 

जिल्ह्यातील अकलूज विभागात २७ हजार ३५५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे वीजबिलापोटी तीन कोटी ६२ लाख, बार्शी विभागात ६१ हजार २४५ ग्राहकांकडे नऊ कोटी ७६ लाख, पंढरपूर विभागात ६५ हजार ३५५ ग्राहकांकडे नऊ कोटी ८१ लाख, सोलापूर शहर विभागात ६३ हजार २७५ ग्राहकांकडे ११ कोटी ६२ लाख, सोलापूर ग्रामीण विभागात ७० हजार ४१५ ग्राहकांकडे ११ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे. 
वांरवार आवाहन करून, नोटीस पाठवूनही वीजबिलांची थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

महावितरणकडून सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीमची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मीटर रिडिंगचे वाचन दरमहा ठरावीक दिवशी व वीजग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. वीजबिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींची माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविली जाते. सोबतच छापील वीजबिलसुद्धा योग्य वेळेत पाठविले जाते.

याशिवाय एसएमएसद्वारे वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश पाठविला जातो. त्यामुळे बिलिंगमधील तक्रारींचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अतिशय कमी झाले आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...