मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
इगतपुरी तालुक्यात १० हजार हेक्टरवर भाताचे नुकसान
नाशिक: इगतपुरी तालुक्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे १२६ गावांतील ९३९० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरस्थिती आणि अतिपावसामुळे इगतपुरी तालुक्यातील १० हजार ३४९ हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी भेटी देणे सुरू केले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना मोठे नुकसान झाल्याचे पाहणीत समोर येत आहे. नुकसानग्रस्त भात उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानीचा सर्वांगीण अहवाल शासनाला पाठवून शक्य तेवढ्या लवकर आपद्ग्रस्तांना दिलासा देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिपावसामुळे शेती क्षेत्राच्या नुकसानग्रस्त गावांतील शेतकऱ्यांचा शेतीची पाहणी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. कृषी विभागाकडून क्षेत्रभेटी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येत आहेत. पारंपरिक पीक असणाऱ्या भात पिकाचे सर्वात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांसह इतरही विविध पिकांचेही नुकसान झालेले आहे.
इगतपुरी तालुक्यातील पिकांचे प्राथमिक नुकसान (हेक्टर)
पीक | बाधित क्षेत्र |
भात | १००५८ |
सोयाबीन | १५४ |
नागली | ११ |
वरई | १११ |
खुरसणी | ७ |
ऊस | ८ |
- 1 of 436
- ››