agriculture news in marathi Over 12,000 farmers in Jalna Seed germination capacity of checked | Agrowon

जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली बियाण्यांची उगवण क्षमता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी रविवारी (ता.२४) १५ हजार शेतकऱ्यांकडे उपलब्ध घरातील सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत जवळपास १२ हजार ३३४ शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम केले. येत्या चार दिवसांत त्याचा नेमका अहवाल प्राप्त होईल. 

जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी रविवारी (ता.२४) १५ हजार शेतकऱ्यांकडे उपलब्ध घरातील सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत जवळपास १२ हजार ३३४ शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम केले. येत्या चार दिवसांत त्याचा नेमका अहवाल प्राप्त होईल. 

येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून त्याचाच पेरणीसाठी वापर करा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्याच्या उद्देशाने जालना जिल्हा कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील कृषी व आत्मा विभागाची यंत्रणा तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी मित्र, कृषी ताई यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली.

त्या अंतर्गत २४ मे रोजी एकाच दिवशी १२३३४ शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध सोयाबीचा बियाणे म्हणून उपयोग होण्यासाठी कृषी विभागाने पुरविलेल्या बियाणे उगवण क्षमता तपासणी पेपर मध्ये टाकले. किती बियाणे उगवण क्षमतेत पास व किती नापास, हे अहवालातून स्पष्ट होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले. 

जवळपास तीस हजार बियाणे उगवण क्षमता तपासणी पेपरचे जिल्ह्यात विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. प्रति गाव दहा ते १५ शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उगवणक्षमता तपासणी करण्यासाठी प्रति शेतकरी दोन याप्रमाणे हे पेपर देण्यात आले. सोयाबीन व इतर बियाणे व क्षमता तपासणी प्रात्यक्षिक अंमलबजावणी करण्यासाठी गावातील कृषी मित्र, कृषी ताई , शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, गावातील प्रगतिशील शेतकरी, गावातील कृषी विभागाचे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची मदत घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या, असे शिंदे म्हणाले. 

बियाणे उगवण क्षमता चाचणी नेमकी कशी करावी, याबाबत व्हिडिओ क्लिपद्वारे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्याचे, तसेच बीज प्रक्रिया नेमकी कशी करावी, याचीही माहिती देण्याचे सूचित करण्यात आले होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...