हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८ हजार क्विंटलवर कापसाची खरेदी

हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी आणि लॉकडाऊनमध्ये शासकीय, खासगी मिळून एकूण १७ हजार २०६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५ हजार २५४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
Over 17,000 farmers in Hingoli Purchase of cotton at 18,000 quintals
Over 17,000 farmers in Hingoli Purchase of cotton at 18,000 quintals

हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी आणि लॉकडाऊनमध्ये शासकीय, खासगी मिळून एकूण १७ हजार २०६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५ हजार २५४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये सीसीआयच्या खरेदी केंद्रावर ८६७ शेतकऱ्यांचा १८ हजार १४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे २ हजार ७१३ शेतकऱ्यांचा ५६ हजार ३७० क्विंटल, ‘सीसीआय’तर्फे ८ हजार २८२ शेतकऱ्यांचा २ लाख ३५ हजार १०० क्विंटल, खासगी बाजारात १ हजार ७७२ शेतकऱ्यांचा ३९ हजार १४४ क्विंटल, बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी २ हजार ४५१ शेतकऱ्यांचा ३९ हजार ८९६ क्विंटल असा एकूण १५ हजार २१८ शेतकऱ्यांचा ३ लाख ७० हजार ५१० क्विंटल कापूस खरेदी केला. 

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील १ हजार ९०८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी गुरुवार (ता.२८) पर्यंत सीसीआयच्या जवळा बाजार आणि वसमत येथील केंद्रावर ८६७ शेतकऱ्यांचा १८ हजार १४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

खासगी बाजारात ५३१ शेतकऱ्यांचा ९ हजार ७०१ क्विंटल, बाजार समित्यांमध्ये ५९० शेतकऱ्यांचा ६ हजार ८९७ क्विंटल असा एकूण १ हजार ९८८ शेतकऱ्यांचा ३४ हजार ७४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तसेच टाळेबंदीपूर्वी आणि त्यामध्ये एकूण १७ हजार २०६ शेतकऱ्यांचा ४ लाख ५ हजार २५४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com