रत्नागिरीतील १८ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती

over the 18 thousand Farmers will get loan relief in Ratnagiri
over the 18 thousand Farmers will get loan relief in Ratnagiri

रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील १८ हजार ६२८ जणांना लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत १५ हजार ३०३ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के काम अपेक्षित आहे. जिल्ह्याला याअंतर्गत सुमारे ८० कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती मिळाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठीचे निकष निश्‍चित करीन राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती संकलित करण्यात आली होती. पात्र शेतकऱ्यांची यादी निश्‍चित झाल्यानंतर ती पोर्टलवर भरण्याचे काम सुरू झाले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक लिंक केला जात आहे. 

जिल्ह्यात शेतीसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामध्ये सर्वाधिक कर्ज प्रकरणे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्येच होतात. पहिल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १८,६२८ शेतकरी निकषानुसार पात्र ठरले होते. त्यामध्ये १२,८९१ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील, तर ५,७३७ शेतकऱ्यांनी इतर बँकांमधून कर्ज प्रकरणे केली. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांना ३० कोटी ७८ लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. इतर बँकांतील लाभार्थ्यांना ४९ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल. 

पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत ७० ते ८० टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाकडून प्रतिदिन याचा आढावा घेण्यात येत आहे. डेटा अपलोडसाठी ३,३२५ शेतकऱ्यांची यादी शिल्लक आहे. १५ फेब्रुवारीपूर्वीच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

५१ शेतकऱ्यांचे आधार मिळेना

पोर्टलवर माहिती भरताना आधार लिंक करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ५१ शेतकऱ्यांचे आधार कार्ड मिळालेले नाही. त्याचा शोध सुरू असून, ३४ जिल्हा बँकांचे, तर १७ इतर बँकांचे ग्राहक आहेत. अल्प कालावधीत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचे मुख्यमंत्र्यांनीही अभिनंदन केले. ही कर्जमाफीची रक्कम एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com