लातूर विभागात २० लाख हेक्टरवर पिकांना विमा कवच

लातूर : ‘‘विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २० लाख ८५ हजार हेक्‍टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले.’’
over 20 lakhs  hectare Crop insurance cover in Latur division
over 20 lakhs hectare Crop insurance cover in Latur division

लातूर : ‘‘विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २० लाख ८५ हजार हेक्‍टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. शुक्रवारी (ता.३१) सायंकाळपर्यंत विमा उतरविण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने विभागातील विमा संरक्षित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. 

लातूर विभागात पाचही जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी जवळपास २९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. ३० जुलैअखेर पर्यंतच्या अहवालानुसार पाचही जिल्ह्यांत जवळपास २७ लाख ८६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली होती. पंतप्रधान पिक विमा संरक्षण योजनेअंतर्गत लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत शुक्रवारी (ता ३१) सकाळपर्यंत ४१ लाख ५ हजार विमा अर्ज आले. त्याद्वारे शेतकऱ्यांनी २० लाख ८५ हजार हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. त्यासाठी जवळपास १७२ कोटी ६ लाख रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही पिक विमा उतरवताना ऑनलाइन साईटची गती संथ राहिली. यासह शेतकऱ्यांना इतर अडचणींना सामोरे जावे लागले. यावेळी ३१ जुलै ही विमा उतरवण्याची अंतिम मुदत होती. मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत असल्याने कोरोना संकटाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवण्यास प्राधान्य दिले. गतवर्षी लातूर विभागात जवळपास ४६ लाख ६८ हजार अर्जांच्या माध्यमातून १८४ कोटी रुपये विमा हप्त्यापोटी भरले गेले. यंदा विहित मुदतीत शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणास प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

पीकविमा स्थिती

जिल्हा अर्ज (लाखात) क्षेत्र (लाख हेक्टर) रक्कम (कोटी)
लातूर १०.२४  ६.१८    ४६.८४
उस्मानाबाद   ९.२१ ५.०० ४०.३९
नांदेड  ९.१२  ४.७७ ४२.०४
परभणी  ६.६६  ३.५५  ३०.८५
हिंगोली २.८२  १.३५ ११.९०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com