तीस लाख हेक्टरवरील पीक मराठवाड्यात बाधित

पीक नुकसान
पीक नुकसान

औरंगाबाद :  मराठवाड्यातील एकूण पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी ६०.७३ टक्के, म्हणजेच २९ लाख ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यंदाच्या खरिपात मराठवाड्यात ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी ८४५० गावांतील ३० लाख २५ हजार ७६२ शेतकऱ्याचे जिरायत, बागायत व फळबाग मिळून २९ लाख ५७ हजार ६०० हेक्टरवरील पीक बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ७३.३२  टक्के क्षेत्र बाधित झाले असून त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ७०.४० टक्के, लातूर जिल्ह्यात ६२.२० टक्के, हिंगोली जिल्ह्यात ६०.९३ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ५९.५० टक्के, परभणी जिल्ह्यात ५९.३९ टक्के, नांदेड जिल्ह्यात ५४.२५ टक्के  तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४१.४३ टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद जिल्ह्यातील १३५५ गावांतील ४ लाख ६२ हजार ४८२ शेतकऱ्यांचे ४०८२७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे ९६३३ हेक्टर, कपाशीचे २११४०६ हेक्टर, तर इतर पिकांच्या १८७२३७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ९७२ गावांतील ५ लाख १० हजार ६५८ शेतकऱ्यांचे ४३३०८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सोयाबीनचे १२५०६७ हेक्टर, कपाशीचे २३९५९४ हेक्टर, इतर पिकांचे ६७५२८ हेक्टरचा समावेश आहे.  परभणी जिल्ह्यातील ८४३ गावांतील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ३९२०३२ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये सोयाबीनचे १५२०५८ हेक्टर, कपाशीचे १५६९४० हेक्टर, इतर पिकांचे २००३४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांतील १ लाख ९४ हजार १७३ शेतकऱ्यांचे २२३५५१ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये सोयाबीनच्या १८५४५५ हेक्टरसह कपाशीच्या २९६२३ हेक्टर व इतर पिकाच्या ८४७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.  नांदेड जिल्ह्यातील १४८८ गावांतील ५ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांचे ४११४१४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सोयाबीनच्या २४१४९८ हेक्टर, कपाशीचे ११७१९८ हेक्टर तर इतर पिकांच्या ५२७१८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील १४०२ गावांतील ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांचे ५९५५०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये सोयाबीनच्या १५०००० हेक्टरसह कपाशीच्या ३७२००० हेक्टर व इतर पिकांच्या ७३५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.  लातूर जिल्ह्यातील ९५१ गावातील १ लाख ८३ हजार ६६२ शेतकऱ्यांचे ३३७०६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये १७६०१८ हेक्टरवरील सोयाबीनसह ६२९२ हेक्टरवरील कपाशी व इतर पिकाच्या १५४७४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३२ गावांतील २ लाख २५ हजार ४६२ शेतकऱ्यांचे २१९६७५ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सोयाबीनच्या १८८३११ हेक्टरसह कपाशीच्या ११४७२ हेक्टर तर इतर पिकांच्या १९८९२ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. नुकसानीचे प्राथमिक अंदाजित क्षेत्र 

पीक बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोयाबीन १२२८९४०
कपाशी ११४४५२९
इतर पीक   ५८४१३१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com