मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा छावण्यांत

चारा छावणी
चारा छावणी

औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत सुरू झालेल्या चारा छावण्यांच्या संख्येत ६७ छावण्यांची भर पडली आहे. आजवर सुरू झालेल्या ६३५ चारा छावण्यांमध्ये चारा पाण्यासाठी ४ लाख २७ हजारावर जनावरे आश्रयाला आली आहेत.  गत आठवाड्यात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत मंजूर ९३१ चारा छावण्यांपैकी ५६८ चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. तर या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ४३ हजार ७९७ लहान मोठी जनावरे दाखल झाली होती. १५ एप्रिलअखेर औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील मंजूर चारा छावण्यांची संख्या ९७६ वर पोचली. तर त्यापैकी ६३५ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या. या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ९३ हजार ३० मोठी व ३४ हजार ३४३ लहान जनावरे मिळून ४ लाख २७ हजार ३७३ जनावरे दाखल झाले आहेत.  औरंगाबाद जिल्ह्यात ४ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ३ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये १७३३ मोठी व ३२४ लहान मिळून २०५७ जनावरे दाखल झाली आहेत. बीड जिल्ह्यात ८८६ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५७६ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.  या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ५७ हजार १०४  मोठे, तर २९ हजार ९०५ लहान मिळून ३ लाख ८७ हजार ९ जनावरे दाखल झाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ८६ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५६ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये ३४ हजार १९३ मोठे व ४११४ लहान जनावरे मिळून ३८ हजार ३०७ जनावरे दाखल झाली आहेत. गत आठवाड्याच्या तुलनेत १५ एप्रिलअखेर चारा छावण्यांमध्ये चारा पाण्यासाठी दाखल झालेल्या जनावरांच्या संख्येत ८३ हजार ५७६ जनावरांची भर पडल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com