पूर्वमोसमी पावसाचा वऱ्हाडात ४० हजार हेक्टरला तडाखा

पूर्वमोसमी पावसाचा वऱ्हाडात  ४० हजार हेक्टरला तडाखा
पूर्वमोसमी पावसाचा वऱ्हाडात ४० हजार हेक्टरला तडाखा

अकोला ः वऱ्हाडात मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून वरिष्ठांकडे एक अहवाल तातडीने पाठविण्यात आला.  दरम्यान बुधवारी (ता. १८) रात्री वाशीम जिल्ह्यात तीन तालुक्यांत जोरदार गारपीट झाल्याने तेथे नुकसान झाले असून त्याचा अहवाल गुरुवारी (ता. १९) बनविण्याचे काम सुरू होते. यामुळे वऱ्हाडातील नुकसान ४० हजार हेक्टरवर पोचणार आहे. या नुकसानात एकट्या बुलडाणा जिल्ह्यातच ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे.  बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर विविध भागात पाऊस, वादळी वारा आणि गारपीट झाली. या आपत्तीत २९६ गावातील ३४ हजार ८०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल समोर आला आहे.  शासनाच्या स्थायी आदेशानुसार यंत्रणांनी पंचनामे करीत अहवाल तयार केला. जिल्ह्यात १३ पैकी आठ तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला. मंगळवारी दुपारपासून जिल्ह्यात विविध तालुक्यांत पूर्वमोसमी पाऊस व गारपीट झाली. या आपत्तीचा जळगाव जामोद तालुक्यातील ११९ गावांना फटका बसला. बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. झालेल्या नुकसानात प्रामुख्याने मोताळा तालुक्यात १७०० हेक्टर, चिखली ५४६९ हेक्टर, खामगाव २३६५ हेक्टर, मलकापूर ८४०० हेक्टर, नांदुरा ५७२० हेक्टर, जळगाव जामोद ८४३६ हेक्टर, संग्रामपूर २,६८३ हेक्टर आणि सिंदखेडराजा तालुक्यात ३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  अकोल्यात ६७७२ हेक्टरवरील पिके बाधित अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने ६ हजार ७७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. महसूल, कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीतून ही माहिती समोर आली. मंगळवारी रात्री बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व अकोट तालुक्यांत गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, मका, केळी, संत्रा, भुईमूग पिकांचे नुकसान झाले. नुकसानीबाबतची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांना आहे. नुकसानात २०३९ हेक्टरवरील गहू, २१०१ हेक्टरवरील हरभरा, ११३५ हेक्टरवरील कांदा, ९१४ हेक्टरवरील भाजीपाला, १०८ हेक्टरवरील मका, २७.५ हेक्टरवरील भुईमूग, सात हेक्टरवरील केळी, ४४ हेक्टरवरील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com