agriculture news in Marathi, over 400 acar ginger crop in threat in Satara, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात चारशे हेक्टरवरील आले पिकात कंदकुज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सातारा  ः गेल्या दोन ते तीन वर्षांत आल्याला समाधानकारक दर मिळाल्याने जिल्ह्यात या वर्षी आले पिकांचे क्षेत्र वाढले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चारशे हेक्टरवरील क्षेत्रास कंदकुजचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सातारा  ः गेल्या दोन ते तीन वर्षांत आल्याला समाधानकारक दर मिळाल्याने जिल्ह्यात या वर्षी आले पिकांचे क्षेत्र वाढले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चारशे हेक्टरवरील क्षेत्रास कंदकुजचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यातील वातावरण आले पिकांस फायदेशीर असल्याने येथील आल्यास मागणी असते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आले पिकाचे दर समाधानकारक राहिल्याने प्रत्येक वर्षी आले पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. या वर्षी आले लागवडीच्यावेळी आल्याचे दर समाधानकारक असल्याने बियाण्याचे दरही तेजीत राहिले होते. आल्याच्या प्रतिगाडीस (५०० किलो) ३५ हजार ते ३६ हजार रुपयांने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी होते. लागवड वाढल्याने बियाण्यास मागणी चांगली राहिली होती. 

साधारणपणे अक्षय तृतीयाच्या महूर्तावर लागवड केली जाते. मात्र या काळात ४० सेल्सिअस अंशांवर तापमान गेले होते. मे महिनाअखेर अशीच परिस्थिती राहिल्याने आले लागवड रखडली होती. यातून काही शेतकऱ्यांनी लागवड केल्याने आले उगवणीवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या सुरुवातीस वातावरणात बदल झाल्याने आले लागवडीस वेग आला होता. या हंगामात जिल्ह्यात २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याचा अंदाज आहे. कोरेगाव, सातारा, खटाव, कराड या तालुक्यांत सर्वाधिक आले पिकांचे क्षेत्र आहे. 

अतिवृष्टीचा परिणाम
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अतिवृष्टीमुळे झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आठ ते दहा दिवस पाऊस सुरू राहिल्याने शेतात पाणी काढता आले नाही. पाण्याचा निचर न झाल्यामुळे आले पिकास कंदकुज होण्यास प्रारंभ झाला आहे. कंदकुजीबरोबर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मोठ्या प्रमाणात फवारणी तसेच आळवणी देण्याचे काम सुरू आहे. यामुळे भांडवली खर्चातही वाढ होणार आहे. पश्चिम भागात अतिपावसाने तर पुर्व भागात कमी पावसाने हुमणीमुळे कंदकुजीचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात झालेल्या लागवडीस सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर कंदकुजच झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने आले पिकांची गणिते चुकणार आहेत.

पीकविम्यात समावेश करावा
आले पिकास भांडवली खर्च मोठा आहे. एक एकर क्षेत्रास मेहनीतीपासून काढणीपर्यंत दीड ते दोन लाख किमान खर्च येतो. आले पिकांच्या दरातील अस्थिरता मोठी असल्याने या पिकांत नुकसान होण्याची भीती जास्त आहे. त्याच आल्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण लवकर येत नाही. काही वेळेस या किडीचा प्रादुर्भावामुळे आले हातचे जाते. हे धोके कमी करण्यासाठी आल्याचा पीकविम्यात समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...