नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका विक्रीपासून वंचित

ना शिक : चार हजारांवर मका उत्पादक शेतकरी विक्रीविना वंचितच राहिले, अशी स्थिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांवर खासगी व्यापाऱ्यांकडे मका विक्री करण्याची वेळ आली आहे.
Over 4,000 farmers in Nashik district deprived of maize sales
Over 4,000 farmers in Nashik district deprived of maize sales

नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या मक्याला रास्त दर मिळत नसल्याने १७६० रुपये हमीभावाच्या आशेने जिल्ह्यातील सात हजारांवर शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी केंद्रांवर नोंदणी केली. मात्र, खरेदी पूर्ण न झाल्याने तीनदा लक्ष्यांक वाढला. तरीही चार हजारांवर मका उत्पादक शेतकरी विक्रीविना वंचितच राहिले, अशी स्थिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांवर खासगी व्यापाऱ्यांकडे मका विक्री करण्याची वेळ आली आहे. 

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१९-२० अंतर्गत शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातच प्रतिएकर १२ क्विंटल ही अट घालण्यात आली. त्यामुळे काही खासगी बाजारात, तर काही शासकीय केंद्रांवर विक्री व्हावा, यासाठी नोंदणी करून शेतकऱ्यांनी वाट पाहिली. यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात दोन टप्प्यात मका खरेदी केली होती. त्यात तिसऱ्यांदा मुदत वाढवून मिळाल्यानंतर विक्री होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

शासनाने किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सरसकट मका खरेदी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र अनेकांनी मका खासगी व्यापाऱ्यांना विकली. आता ही शेतकरी संख्या कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८ केंद्रांवर शुक्रवार (ता.३१ जुलै) अखेर ९७ हजार २१९ क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे.

भरडधान्य मका खरेदीद्वारे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी झाली, असे अनेक घटक पेमेंटच्या प्रतिक्षेत आहेत. तर, बाकीचे नोंदणी करून विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. 

पोर्टल बंद झाल्यानंतर अजूनही क्वचित शेतकरी हमीभावाच्या विक्रीविना राहिले आहेत. शासनाने खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा. - मनोहर देवरे, अध्यक्ष, सटाणा दक्षिण भाग, विविध कार्यकारी विकास सेवा संस्था, सटाणा.

मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच   नोंदणी केली. मात्र, खरेदीसाठी  निरोप नसल्याने चकरा मारल्या.  अखेर हंगामासाठी भांडवल    नसल्याने खासगी व्यापाऱ्यांकडे मका विकली.   - दिगंबर निकम, मका उत्पादक, विठेवाडी, ता. देवळा

खरेदीची स्थिती (क्विंटल)

शेतकरी नोंदणी ७५८४
शेतकरी खरेदी ३३९०
वंचित राहिलेले शेतकरी ४१९४
एकूण खरेदी  ९७ हजार २१९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com