सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्यात

गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांतील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांची ४० हजार ६७१ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्यात Over 41,000 hectares in Sangli Crops in flood waters
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्यात Over 41,000 hectares in Sangli Crops in flood waters

सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांतील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांची ४० हजार ६७१ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. राष्ट्रीय आपत्ती धोरणानुसार या सर्व शेतकऱ्यांना ४६ कोटी रुपयांचे नुकसान होते. प्रत्यक्षात त्यांच्या काही अधिक पटीने शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी शेतीत गेल्यामुळे पुढील हंगामापर्यंत पाण्याचा निचरा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर असेल. कृष्णा, वारणा नदीची पाणीपातळी संथगतीने उतरत आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढतो आहे. पाण्याखालील सर्वाधिक क्षेत्र उसाचे आहे. त्यातही जे पीक सगळे बुडले आहे, त्याला धोका जास्त आहे. शिवाय आडसाली लागणी, लहान उसाच्या सुरळीत पाणी गेल्याने ऊस वाळण्याची शक्यता आहे. उसाचे क्षेत्र २५ हजार १९ हेक्टर आहे. भात- २ हजार २२८ हेक्टर, ज्वारी- २८ हेक्टर, मका- १३६ हेक्टर, सोयाबीन- ७ हजार ९० हेक्टर, भुईमूग- ४ हजार ३०३ हेक्टर, कडधान्य- २५८ हेक्टर, अन्य पिके- १५ हजार १९ हेक्टर, भाजीपाला- ७२७ हेक्टर, फुलपिके- ६० हेक्टर, फळपिके- ६८६ हेक्टर आणि द्राक्ष बागा- १२९ हेक्टर यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय नुकसान         

  • तालुका        क्षेत्र (हेक्टरमध्ये)
  • मिरज    १०,३४०
  • वाळवा    १३,४९५
  • शिराळा    ६,६३१
  • पलूस १०,१४६
  • तासगाव        ५९
  • एनडीआरएफचे भरपाई निकष...(हेक्टरी)    

  • जिरायती क्षेत्र    ६ हजार ८०० रुपये
  • बागायती पिके    १३ हजार ५०० रुपये
  • द्राक्ष व फळपिके    १८ हजार रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com