पैठणमधील ५ हजारावर शेतकऱ्यांना मृग बहराचा फळपीक विमा मंजूर

पैठण, जि. औरंगाबाद : पैठण तालुक्यातील फळपीक विमा उतरणाऱ्या ११ हजार ३६० पैकी ५ हजार १९७ शेतकऱ्यांना पिकांच्या मृग बहराचा फळपीक विमा मंजूर करण्यात आला आहे. मोसंबीचा विमा केवळ तीनच मंडळात मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Over 5,000 farmers in Paithan Approved mrug fruit crop insurance
Over 5,000 farmers in Paithan Approved mrug fruit crop insurance

पैठण, जि. औरंगाबाद : पैठण तालुक्यातील फळपीक विमा उतरणाऱ्या ११ हजार ३६० पैकी ५ हजार १९७ शेतकऱ्यांना पिकांच्या मृग बहराचा फळपीक विमा मंजूर करण्यात आला आहे. मोसंबीचा विमा केवळ तीनच मंडळात मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील एकूण अधिसूचित फळपिकांचा ९ हजार १८९ हेक्‍टर क्षेत्रावरील फळपिकांचा ११ हजार ३६० शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला होता. ११ कोटी ४० लाख ६० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असलेल्या पीक विमा उतरवणाऱ्यांपैकी ५ हजार १९७ शेतकऱ्यांना ५ कोटी ७ लाख ४९ हजार रुपयांचा पिक विमा परतावा मंजूर झाला आहे. 

यंदाच्या मृग बहाराची मोसंबी कोरोनाच्या संकटात सापडली. बागवनांनी पाठ फिरवली. झालेले सौदे सोडले. बाजारपेठ ठप्प असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. कवडीमोल दराने मृग बहाराची मोसंबी उत्पादकांना विकावी लागली. त्यामुळे बहुतांश मंडळातील शेतकऱ्यांना मोसंबीचा पिक विमा परतावा मिळण्याची आशा होती. परंतु, विमा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

आडुळ, बालानगर व विहामांडवा या तीन मंडळातील मोसंबी उत्पादकांना विमा परतावा मंजूर आहे. त्यामध्ये आडूळ मंडळातील १८५१, बालानगर मंडळातील १८०५ व विहामांडवा मंडळातील ३८२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

डाळिंबाचा विमा परतावा मंडळातील ५७३, तर पाचोड बुद्रुक मंडळातील ५८६ शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. १५ जून ते १५ जुलै दरम्यान कमी पाऊस तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड ही कारणे लक्षात घेऊन विमा कंपनीने हा विमा परतावा मंजूर केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी कळविले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com