Agriculture news in marathi Over 65,000 citizens returned to the village in varhad region | Agrowon

वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतले

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

अकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये गेलेले वऱ्हाडातील सुमारे ६५ हजारांवर नागरिक आपल्या गावी परतले आहेत. बुलड़ाणा व वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी २७ हजार तर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर नागरिक परतले आहेत.

अकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये गेलेले वऱ्हाडातील सुमारे ६५ हजारांवर नागरिक आपल्या गावी परतले आहेत. बुलड़ाणा व वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी २७ हजार तर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर नागरिक परतले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा होताच शहरांमध्ये वास्तव्यास असलेले ग्रामीण भागातील नागरिक गावी परतले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध शहरांमध्ये हे तरुण, नागरिक व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने गेलेले होते. शहरीभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने धास्तीपोटी हे सर्वजण परतले आहेत.  
संचारबंदी लागू केल्यानंतरही विविध वाहनांद्वारे त्यांनी घराची रस्ता धरला होता. बाहेर जिल्ह्यांमधून, महानगरांमधून आलेल्यांची आरोग्य तपासणीचे काम वेगाने केले जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी प्रामुख्याने विदेशातून आलेल्यांपैकी ८५ जणांना हॉस्पिटल क्वारंटाइन आणि आयसोलेशन कक्षासह होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला. 

जिल्हा परिषदेचा जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुका नियंत्रण कक्षाने ही आकडेवारी गोळा केली. २७ हजारांपैकी २० हजार लोकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये सर्वाधिक साडेतीन हजार नागरिक एकट्या मोताळा तालुक्यातील आहेत. 

वाशीम जिल्ह्यातील २७ हजार २०९ नागरिक गावी परतले आहेत. त्यापैकी २३ हजार २०९ जण ग्रामीण भागातील आपापल्या गावांमध्ये पोचले आहेत. तर चार हजार हे शहरातील आहेत. या जिल्ह्यात वाशीम तालुक्यातील ५५६२ आणि मानोरा तालुक्यातील ५२३२ असे सर्वाधिक नागरिक रोजगारासाठी मुंबई, पुणे यासह आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशात कामांसाठी गेलेले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे ते गावी परतले आहेत. 

अकोला जिल्ह्यातील १२ हजारांवर नागरिक परतले असून त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.  पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घरवापसी झाली आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात नागरिकांनी महानगरातून येणाऱ्यांना विरोधही केला होता. मात्र, हा मुद्दा आता सुटला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...