Agriculture news in marathi Over 81,000 in Pune division New power connections | Page 2 ||| Agrowon

पुणे विभागात ८१ हजारांवर  नवीन वीज जोडण्या 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

पुणे विभागात गेल्या दोन महिन्यांत तब्बल ८१ हजार ५९६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृषी पंपाच्या ९६२० वीज जोडणी केल्या आहेत.

सांगली : पुणे विभागात गेल्या दोन महिन्यांत तब्बल ८१ हजार ५९६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृषी पंपाच्या ९६२० वीज जोडणी केल्या आहेत. तर घरगुती ५८ हजार ९९०, वाणिज्यिक १०२६१, औद्योगिक १९६४ आणि कृषिपंपांच्या ९६२० आणि इतर ७६१ नवीन वीज जोडण्यांचा केल्या असल्याची महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली. 

मार्च महिन्यात २३ हजार ५३३ तर एप्रिलमध्ये ५८ हजार ६३ अशा एकूण ८१ हजार ५९६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यामध्ये घरगुती- ४०,५१०, वाणिज्यिक- ६२३९, औद्योगिक- ८८४, कृषिपंप- २८९३ व इतर ३४४ अशा एकूण ५० हजार ८७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यामध्ये घरगुती- ५०८८, वाणिज्यिक-९४७, औद्योगिक- १११, कृषिपंप-२०८३ व इतर ९१ अशा एकूण ८३२० वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये घरगुती- ३३५७, वाणिज्यिक- ६४२, औद्योगिक- १५३, कृषिपंप- २३३८ व इतर ७० अशा एकूण ६ हजार ५६० नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती- ३३३०, वाणिज्यिक- ८२१, औद्योगिक- ९४, कृषिपंप- १३७४ व इतर ८८, अशा एकूण ५७०७ आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती- ६७०५, वाणिज्यिक- १६१२, औद्योगिक- ७२२, कृषिपंप- ९३२ व इतर १६८ अशा, एकूण १० हजार १३९ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

पुणे विभागात २४ ते ४८ तासांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या ४ मोठ्या प्रकल्पांना नवीन वीजजोडणी व वाढीव वीजभार देण्यात आला आहे. सात कोविड रुग्णालयांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. 

 


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...