विधानसभा निवडणूक ः राज्यभरातून ५५३४ उमेदवारांचे अर्ज दाखल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.४) राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये ३७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. २८८ मतदारसंघांसाठी एकूण ५५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. 

श्री. शिंदे म्हणाले, की नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कँटानमेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वांत कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.  नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली; तर धुळे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांत ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत १७५ उमेदवार, बुलडाणा जिल्ह्यातील ७ मतदारसंघांत ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यातील ५ मतदारसंघांत १०७ उमेदवार, वाशीम जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ७० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघांत ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यातील ७ मतदारसंघांत १३६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. 

नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यातील ५ मतदारसंघांत १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यातील ६ मतदारसंघांत ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांत ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यातील ७ मतदारसंघांत १३२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. 

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत ४४१ उमेदवार, नगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यातील ६ मतदारसंघांत २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघांत १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ मतदारसंघांत ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मतदारसंघांत ४५ उमेदवार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com