म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे १०२ पंप सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली   ः म्हैसाळ योजनेच्या मुख्य सहा आणि उप उपसा सिंचन योजनेतून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. आजअखेर या योजनेच्या ८६ ते ९० पंपांनी पाणी उपसा केला जायचा. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाण्याची मागणी वाढल्याने १०२ पंपांनी पाणी उपसा सुरू केला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू होऊन वीस दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. दुष्काळी भागातून पाण्याच्या वाढती मागणीमुळे योजनेच्या पंपांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यांत पाणी पोचले आहे. सध्या म्हैसाळ योजनेच्या म्हैसाळ येथील पहिल्या टप्प्यात २३ पंप सुरू आहेत. नरवाड येथील दुसऱ्या टप्प्यातून सर्वाधिक २८ पंपांनी पाणी उपसा सुरू आहे. मुख्य कालव्यातून पाणी वाहू लागले आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा असा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. सध्या पंपांची संख्या वाढवली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पोटकालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केले जाते आहे.  

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आदी तालुक्‍यांत कालव्यांची गळती मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. या कालव्यांची दुरुस्ती केली असल्याने पाण्याची गळती थांबली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला असून लाभक्षेत्रात वेळेत पाणी जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे नोंदवावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे दुष्काळी भागातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी नोंदवली असल्याने त्यानुसार शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com